धुळे : धुळे जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. देवपूरातील गणेशा रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णाच्या मृ़त्यूनंतर त्याच्या खिशातील रोकड लांबवल्याप्रकरणी पाच जणांविरुध्द देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
देवपूरातील श्रीगणेशा रूग्णालयात कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला. त्यानंतर रुग्णालयातील पाच कर्मचाऱ्यांनी मृताचे खिसे चाचपडले होते. तसेच खिशातील सुमारे ३५ हजारांची रोकड लांबवली होती. हा प्रकार रुग्णालयातील सीसीटिव्हीने टिपल्यानंतर मृतांच्या नातलगांनी सबंधितांना धारेवर धरले. जिल्हाधिकारी संजय यादव यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. शिवाय जिल्हा पोलिस अधिक्षक चिन्मय पंडीत यांना तातडीने चौकशी करुन गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
त्यानंतर देवपूर पोलिस ठाण्याचे अधिकारी चंद्रकांत पाटील यांनी सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले. या प्रकरणी मृत व्यक्तीचे मित्र दीपक रमेश पाटील (रा. करवंद , ता. शिरपूर) यांनी तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार मृत व्यक्तीचे सुमारे ३५ हजार रुपये काढून घेणाऱ्या पाच वॉर्डबॉय विरोधात भांदवि कलम ४०४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
महत्वाच्या बातम्या
- करावे काय? आर्थिक उत्पन्न नाही, कर्ज घ्यावे तर चारपट व्याजदर
- ‘कोरोना रोखण्यास योगी सरकार अपयशी’, भाजप आमदाराकडून घरचा आहेर
- …आणि काईन जेमिनसलने नेटमध्ये विराटला गोलंदाजी करण्यास दिला नकार
- धक्कादायक बातमी : माजी सैनिकाचा कोल्हापुरात ऑक्सिजनअभावी तडफडून मृत्यू
- राज्य सरकारच्या निष्काळजीपणामुळे ६,४४१ मेट्रिक टन डाळीचे नुकसान
- ऑस्ट्रेलियातील खेळाडू मायदेशी परतल्यास भरावा लागणार दंड, तुरुंगवास होण्याची देखील शक्यता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

