अहमदाबाद : आयपीएल स्पर्धेत जगभरातील दिग्गज खेळाडू एकत्र येऊन एकाच संघात खेळतात. आयपीएलमध्ये अनेक खेळाडू एकत्र खेळतात, मात्र हेच खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकामेकांना झुंज देत असतात. आयपीएलच्या माध्यामातून अनेक गोष्टीची देवाण घेवाण होत असते.
आयपीएलमध्ये एकाच संघाचा भाग असलेले वेगवेगळ्या देशाचे दोन खेळाडू एकत्र खेळले तर त्यांना एकमेकांची चांगली आणि कमकुवत बाजु समजण्याची शक्यता असते. या महितीचा उपयोग अंतरराष्ट्रीय सामन्यात एकमेकाविरोधात होण्याची शक्यता असते. आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने एका सराव सत्रादरम्यान न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू काईल जेमिनसनला कसोटी सामन्यासाठी वापरण्यात येत असलेल्या ड्युक चेंडुने गोलंदाजी करण्यास सांगितले.
यावर जेमिनसनने विनम्रपणे नकार दिला. कारण आयपीएल स्पर्धेनंतर इंग्लंडमध्ये जुन महिन्यात जागतीक कसोटी चॅम्पीयनशीपचा सामना भारत आणि न्युझिलंड संघादरम्यान होणार आहे. या सामन्यात विराट कोहली आणि काईल जेमिनसन आमने सामने असतील . भारताविरुद्ध झालेल्या अनेक कसोटी सामन्यात जेमिनसनने विराट कोहलीला चांगलेच सतवले आहे.
महत्वाच्या बातम्या
- कोरानाची तिसरी लाट ग्राह्यधरुन तयारी सुरू: पालकमंत्री नवाब मलिक
- धक्कादायक बातमी : माजी सैनिकाचा कोल्हापुरात ऑक्सिजनअभावी तडफडून मृत्यू
- राज्य सरकारच्या निष्काळजीपणामुळे ६,४४१ मेट्रिक टन डाळीचे नुकसान
- ऑस्ट्रेलियातील खेळाडू मायदेशी परतल्यास भरावा लागणार दंड, तुरुंगवास होण्याची देखील शक्यता
- आजोबांच्या मृत्यूनंतरही राजस्थानच्या सलामीवीर खेळाडूने घेतला ‘हा’ निर्णय!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

