लखनऊ : देशभरात कोरोना स्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. मोदी सरकार काँग्रेसशासित राज्यांवर उपाययोजना बाबतीत अन्याय करत असल्याचा आरोप काँग्रेसकडून नेहमी होतोय. उत्तरप्रदेश, गुजरातला झुकते माप देत असल्याची टीका मोदी सरकारवर होतेय. पण उत्तरप्रदेशमध्ये कोरोना स्थिती गंभीर असल्याचा दावा भाजपच्याच एका आमदाराने केलाय. यामुळे योगी सरकारला भाजपकडून घरचा आहेर मिळालाय.
बरेली जिल्ह्यातील नवाबगंजचे भाजपचे आमदार केसरसिंह, लखनऊ पश्चिमचे आमदार सुरेशकुमार श्रीवास्तव यांचे कोरोनामुळे निधन झाले. आमदार रमेशचंद्र दिवाकर यांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला. गेल्या वर्षी मंत्री चेतन चौहान व कमल रानी यांचाही मृत्यू झाला होता. तसेच लोकांना वैद्यकीय सुविधा मिळत नाहीत. अशी व्यवस्था लोकप्रतिनिधी केंद्रित असली पाहिजे. नोकरशाहीला केंद्रित नसावी. परंतु देशात,राज्यात भाजप सरकार असूनही पक्षाचे मंत्री, आमदारांचा औषधाअभावी मृत्यू होत आहे.
युपीतील बलिया जिल्ह्यातील भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी योगी सरकारवर कोरोना परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळली नसल्याचा आरोप केला आहे. सिंह म्हणाले, नोकरशाहीच्या साह्याने कोरोनावर नियंत्रण मिळवण्याचा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा प्रयोग अयशस्वी ठरला आहे. बैरिया मतदारसंघाचे आमदार सिंह म्हणाले, योग्य व्यवस्थेचा अभाव असल्यामुळेच लोक कोरोनाची शिकार ठरत असल्याचे मानले जाते.
महत्वाच्या बातम्या
- …आणि काईन जेमिनसलने नेटमध्ये विराटला गोलंदाजी करण्यास दिला नकार
- धक्कादायक बातमी : माजी सैनिकाचा कोल्हापुरात ऑक्सिजनअभावी तडफडून मृत्यू
- राज्य सरकारच्या निष्काळजीपणामुळे ६,४४१ मेट्रिक टन डाळीचे नुकसान
- ऑस्ट्रेलियातील खेळाडू मायदेशी परतल्यास भरावा लागणार दंड, तुरुंगवास होण्याची देखील शक्यता
- आजोबांच्या मृत्यूनंतरही राजस्थानच्या सलामीवीर खेळाडूने घेतला ‘हा’ निर्णय!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

