🕒 1 min read
कोल्हापूर : भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून अयोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच, रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसीवीर, अपुरी आरोग्य यंत्रणा, डॉक्टरांची कमतरता व इतर औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला असून व्यवस्थेविरोधात नागरिकांमध्ये चीड निर्माण होत आहे.
कोल्हापुरात माजी सैनिकाचा ऑक्सिजनअभावी तडफडून मृत्यू झाला. करवीर तालुक्यातील गिरगाव येथील 41 वर्षीय सर्जेराव पांडुरंग कुरणे यांचं निधन झालं. हॉस्पिटलमधील ऑक्सिजन संपल्याने कुरणे यांना प्राण गमवावे लागल्याचे समोर आले आहे. त्यानंतर आक्रमक झालेल्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरलं.
माजी सैनिक सर्जेराव पांडुरंग कुरणे यांचा शनिवारी सकाळी ऑक्सिजनअभावी तडफडून मृत्यू झाला. कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. कोल्हापूर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. दररोज एक हजाराहून अधिक नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद जिल्ह्यात होत आहे. उपचाराअभावी रुग्णांचे बळी जाण्याची मालिका सुरुच आहे.सर्जेराव कुरणे यांनी सैन्य दलात चांगली कामगिरी बजावली होती. सरावादरम्यान त्यांच्या हातात बॉम्ब फुटला होता. अतिशय धाडसी आणि मनमिळावू स्वभावाचे सर्जेराव कुरणे प्रत्येकाच्या अडी-अडचणीला धावून जाण्यासाठी प्रसिद्ध होते.
दरम्यान भारतात गेल्या 24 तासात देशात 4,01, 993 नव्या रुग्णांची भर पडली असून 3,523 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. शुक्रवारी देशात जवळपास तीन लाख रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. त्या आधी गुरुवारी देशात 3.86 लाख रुग्णांची भर पडली होती. कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. जगभरातील एकाच दिवशी वाढणाऱ्या रुग्ण संख्येपैकी 40 टक्के रुग्णसंख्या ही एकट्या भारतात वाढत असल्याचं समोर आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- राज्य सरकारच्या निष्काळजीपणामुळे ६,४४१ मेट्रिक टन डाळीचे नुकसान
- केंद्राकडून राज्यांना मदतीचा हात, 8873.6 कोटी रुपयांचा दिला अॅडवान्समध्ये निधी
- भारतात आता लसीची कमतरता जाणवणार नाही,सीरम कंपनीने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
- भारताला आता कडक लॉकडाऊनची गरज, ज्यो बायडन यांच्या प्रमुख आरोग्य सल्लागाराचे मत
- शिवभोजन थाळीने पार केला ४ कोटींचा टप्पा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

