Share

करावे काय? आर्थिक उत्पन्न नाही, कर्ज घ्यावे तर चारपट व्याजदर

Published On: 

बीड : कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊनमुळे अनेकांसमोर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे उदरनिर्वाह, आर्थिक गरजेसाठी बहुतांश नागरिकांनी सोने तारण ठेवण्याचा पर्याय निवडला आहे. पण स्टॅम्पपेपर म्हणजेच बॉण्ड मिळत नसल्याने खासगी फायनान्समध्ये दागिने ठेवून अव्वाच्या सव्वा व्याजदराने सोने तारण कर्ज घ्यावे लागत आहे. यामुळे नागरिकांना मोठी आर्थिक फटका बसत आहे. साधारणतः बँकेत ७ ते १० टक्के असलेले सोने तारण कर्ज खाजगी फायनान्समधून घेतल्यास १६ ते २८ टक्के व्याज आकारला जातो.

दुसरीकडे राज्यात सुरू असलेली संचारबंदी आणि लाकडाऊन यामुळे सोनेतारण कर्जासाठी आवश्यक असलेले स्टॅम्पपेपर शहरभरात फिरूनही उपलब्ध होत नसल्याने नाईलाजास्तव लोकांना बँक सोडून खाजगी वित्तीय संस्थांचा सहारा घ्यावा लागत आहे. गतवर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेला लॉकडाऊन आणि त्यामुळे अनेकांना गमवावा लागलेला आपला रोजगार ही बाब अनेकांसाठी अडचणीची ठरली होती. तीच परिस्थिती आजही आहेच.

अनपेक्षितपणे कुटुंबातील सदस्यांना आरोग्यविषयक खर्चास सामोरे जावे लागत आहे. अशावेळी सोने तारण ठेवून कर्ज व त्या माध्यमातून औषधोपचार घेण्याची वेळ अनेकांना आली आहे.  आपत्कालीन स्थिती व खर्चाचा ताळमेळ बसवण्याची उडालेली धावपळ या सर्व पार्श्वभूमीवर हा पर्यायदेखील लोक आता जवळ करू लागले आहे. पण केवळ स्टॅम्पपेपर उपलब्ध होत नाहीत म्हणून मोठी आर्थिक झळ नागरिकांना सहन करावी लागत आहे. काही लोकांना सोने तारण कर्ज घेतल्याशिवाय पर्यायच रहात नाही. त्यामुळे आर्थिक झळ बसत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!