जळगाव : चाळीसगाव येथे मैत्रीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. पतीच्या मित्रानेच विवाहितेशी असलेल्या ओळखीचा गैरफायदा घेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून संशयित निजाम शेख जकीउद्दीन (वय २७) याच्याविरोधात चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, घाटरोड भागात २२ वर्षीय वर्षीय विवाहिता पती व तीन मुलांसह राहते. तिच्या पतीचा भंगाराचा व्यवसाय आहे. पतीचा मित्र व शहरातील एका गॅरेजवर काम करणारा निजाम शेख जकीउद्दीन मुजावर (रा. कादरीनगर) याची विवाहितेच्या पतीबरोबर अडीच वर्षांपासून मैत्री आहे. त्यामुळे संशयिताचे विवाहितेच्या घरी येणे जाणे सुरु होते. २९ एप्रिल रोजी रात्री ८.३० वाजता विवाहितेला संशयित निजाम शेख याने मोबाईलवर फोन केला. तुझे व्हिडिओ व फोटो माझ्या मोबाइलमध्ये आहेत. ते डिलीट करून घेऊ असे सांगून त्याने विवाहितेला एकांतात बोलावले.
पती येताच मित्र फरार, पत्नी ठाण्यात
संबंधित विवाहित महिला रात्री साडेआठच्या सुमारास निजाम शेख याने बोलाविलेल्या ठिकाणी गेली. त्यावेळी निजाम शेख याने मोबाईल न दाखवता महिलेवर अत्याचार केला. याच दरम्यान विवाहितेचा पती आल्याने मुजावरने तेथून पलायन केले. यानंतर पीडितेने लागलीच पतीसह शहर पोलिस स्टेशनला जात फिर्याद दिली. यानुसार निजाम शेख जकीउद्दीन मुजावर याच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- धक्कादायक! रुग्णालय कर्मचाऱ्यांनी कोरोना बळीच्या खिशातील पैसे काढले, पाच जणांवर गुन्हा
- करावे काय? आर्थिक उत्पन्न नाही, कर्ज घ्यावे तर चारपट व्याजदर
- ‘कोरोना रोखण्यास योगी सरकार अपयशी’, भाजप आमदाराकडून घरचा आहेर
- …आणि काईन जेमिनसलने नेटमध्ये विराटला गोलंदाजी करण्यास दिला नकार
- धक्कादायक बातमी : माजी सैनिकाचा कोल्हापुरात ऑक्सिजनअभावी तडफडून मृत्यू
- राज्य सरकारच्या निष्काळजीपणामुळे ६,४४१ मेट्रिक टन डाळीचे नुकसान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

