Share

Women’s T20 Challenge 2022 VEL vs TRL : सोलापूरच्या किरण नवगिरेचा डंका, ‘या’ विक्रमाची ठरली मानकरी

Published On: 

मुंबई : गुरुवारी झालेल्या सामन्यात ट्रेलब्रेझर्स संघाने व्हेलोसिटी संघावर १६ धावांनी विजय मिळवला. सामन्याच्या सुरूवातीला वेलोसिटी संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र, ट्रेलब्रेझर्स संघाच्या फलंदाजांनी त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरवला. ट्रेलब्रेझर्सने या सामन्यात ५ विकेट्स गमावत १९१ धावांचे आव्हान उभे केले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना व्हेलोसिटीकडून शेफाली वर्मा आणि यास्तिका भाटिया यांनी डावाची सुरुवात केली. मात्र, चौथ्या षटकाच्या सहाव्या चेंडूवर यास्तिका १९ धावा करून तंबूत परतली.

यानंतर तिसऱ्या क्रमांकावर किरण नवगिरे फलंदाजीला आली. यावेळी तिने आपल्या बॅटमधून धावांचा पाऊस पाडला. तिने यावेळी फलंदाजी करताना अवघ्या ३४ चेंडूत ६९ धावा चोपल्या. या धावा करताना तिने ५ चौकार आणि ५ षटकारांची बरसात केली. या ५ षटकारांमुळे तिच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली. किरण महिला टी२० चॅलेंज स्पर्धेत खेळताना एका डावात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या महिला खेळाडूंच्या यादीत अव्वलस्थानी पोहोचली आहे. विशेष म्हणजे, तिने आपले अर्धशतक फक्त २५ चेंडूत पूर्ण केले. हे या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक ठरले.

या स्पर्धेत तिच्यापाठोपाठ संयुक्तरीत्या दुसऱ्या स्थानी सब्भीनेनी मेघना आणि चमारी अट्टापट्टू यांचा क्रमांक लागतो. मेघनानेही गुरुवारी झालेल्या वेलोसिटीविरुद्धच्या सामन्यात ४ षटकार मारले होते. दुसरीकडे, २०१९ मध्ये अट्टापट्टूनेही ४ षटकार मारले होते.

महिला टी२० चॅलेंज स्पर्धेत खेळताना एका डावात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाज
५ षटकार- किरण नवगिरे (विरुद्ध ट्रेलब्रेझर्स, २०२२)*
४ षटकार- सब्भीनेनी मेघना (विरुद्ध वेलोसिटी, २०२२)
४ षटकार- चमारी अट्टापट्टू (२०१९)

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!