🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मधील चेन्नई सुपर किंग्जचे थ्रोडाऊन स्पेशालिस्ट कोंडप्पा राज पिलानी यांनी महेंद्रसिंह धोनीसोबतच्या पहिल्या भेटीची कहाणी शेअर केली आहे. भारताचा माजी कर्णधार धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. आयपीएलच्या १३व्या हंगामाला सुरुवात होण्याच्या काही दिवस आधी १५ ऑगस्ट २०२०रोजी धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. CSKसाठी तयारी शिबिर होते. आयपीएल स्पर्धा जवळ आली होती. धोनीला नेट्समध्ये सराव करण्याची गरज होती.
चेन्नई सुपर किंग्जच्या अधिकृत वेबसाइटशी बोलताना थ्रोडाउन स्पेशालिस्ट कोंडप्पा राज पिलानी म्हणाले, ”आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्तीनंतर धोनीचे हे पहिले कॅम्प होते. मग मी त्याला पहिल्यांदा पाहिले. त्याने मला सांगितले की तुम्ही थ्रोडाऊन करणार आहात. त्यानंतर धोनीने मला चेंडू टाकण्यास सांगितले, त्यानंतर संघ आनंदी झाला. नेट्स गोलंदाज त्याच्या निवृत्तीबद्दल बोलत होते.”
पिलानी पुढे म्हणाले, ”स्टीफन फ्लेमिंग, मायकेल हसी आणि सर्वांनी मला सांगितले, की धोनी येत आहे आणि त्याच्याकडे काळजीपूर्वक चेंडू टाका. माझे पहिले दोन चेंडू वाइड होत्या. पुढचा चेंडू फुल टॉसचा होता. यानंतर धोनी माझ्याकडे आला आणि म्हणाला, माझ्याकडे बघणे थांबवा आणि चेंडू टाका. त्याने मला नैसर्गिकरित्या गोलंदाजी करण्यास सांगितले. त्यानंतर मला पाहिजे तिथे गोलंदाजी केली. धोनीला खूप आनंद झाला. तेव्हापासून तो मला माझ्या नावाने संबोधू लागला.”
Touched by all the Yellove this year! Your whistles keep us going forward! ????????#YelloveAnyday #Yellove #WhistlePodu ???????? pic.twitter.com/DMNq4tNV0D
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) May 20, 2022
धोनीने आयपीएल २०२२मध्ये सर्वोत्तम फलंदाजी केली. त्याने १४ सामन्यांच्या १३ डावात २३२ धावा केल्या. यादरम्यान त्याने अर्धशतक झळकावले. मुंबईविरुद्धच्या सामन्यात धोनीने शेवटच्या चेंडूवर चौकार मारून सीएसकेला विजय मिळवून दिला होता. मात्र, आयपीएल २०२२ मध्ये चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी अतिशय लाजिरवाणी होती. १५व्या हंगामात चेन्नई संघाला १४ सामन्यांपैकी फक्त ४ जिंकता आले. ८ गुणांसह चेन्नईचा संघ नवव्या स्थानावर राहिला.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
