Share

Women’s T20 Challenge 2022 SNO vs VEL Final : अंतिम सामन्यात व्हेलॉसिटीने सुपरनोव्हासच्या फलंदाजांना रोखले; विजयासाठी १६५ धावांचे लक्ष्य

Published On: 

मुंबई: महिला टी-20 चॅलेंजचा अंतिम सामना व्हेलॉसिटी आणि सुपरनोव्हास यांच्यात पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्यात सुपरनोव्हास संघाने प्रथम फलंदाजी करताना १६५ धावा केल्या आहेत. सामन्याच्या सुरुवातीला व्हेलॉसिटीची कर्णधार दीप्ती शर्मा ना नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. स्पर्धेत सुपरनोव्हा आणि व्हेलॉसिटी या दोन्ही संघांनी प्रत्येकी १-१ सामन्यात विजय मिळवला आहे, तर १-१ सामन्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. व्हेलॉसिटी संघाला ट्रेलब्रेझर्स संघाने हरवले आहे तर सुपरनोव्हास संघाला व्हेलॉसिटी कडून पराभव पत्करावा लागला आहे.

सुपरनोव्हासचा डाव

प्रथम फलंदाजी करताना संघाकडून सलामी फलंदाज प्रिया पूनिया आणि डिआंड्रा डॉटिन यांनी चांगली सुरुवात करून दिली. प्रिया पुनियाने २८ धावांची सावध खेळी केली. प्रिया बाद झाल्यानंतर डिआंड्रा डॉटिनने कर्णधार हरमनप्रीत कौर च्या साथीने भागीदारी रचली. डिआंड्रा डॉटिनने ६२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. हरमनप्रीत करणे जलद गतीने फलंदाजी करत २९ चेंडूत ४३ धावा काढल्या. इतर फलंदाजांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. सुपरनोव्हासने २० षटकांत ७ गडी गमावून १६५ धावा उभ्या केल्या आहेत. व्हेलॉसिटी संघाकडून गोलंदाजी करताना केट क्रॉस, सिमरन बहादुर आणि कर्णधार दीप्ती शर्मने प्रत्येकी २-२ गडी बाद केले. तर अयाबंगा खाकाला १ गडी बाद करण्यात यश आले.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

सुपरनोव्हा – (संभाव्य): प्रिया पुनिया, डिआंड्रा डॉटिन, हरलीन देओल, तानिया भाटिया (विकेटकीपर), हरमनप्रीत कौर (कर्णधार), सून लुस, पूजा वस्त्राकर, अलाना किंग, सोफी एक्लेस्टोन, मानसी जोशी आणि राशी कनोजिया.

व्हेलॉसिटी – (संभाव्य): शेफाली वर्मा, नट्टाकन चांटम, यास्तिका भाटिया (विकेट कीपर), लॉरा वॉलवर्ड, दीप्ती शर्मा (कर्णधार), किरण प्रभू, स्नेह राणा, राधा यादव, सिमरन बहादुर, अयाबंगा खाका आणि केट क्रॉस.

महत्वाच्या बातम्याया:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!