🕒 1 min read
मुंबई: महिला टी-20 चॅलेंजचा अंतिम सामना व्हेलॉसिटी आणि सुपरनोव्हा यांच्यात होणार आहे. हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. सामन्याच्या सुरुवातीला व्हेलॉसिटीची कर्णधार दीप्ती शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सुपरनोव्हा आणि व्हेलॉसिटी या दोन्ही संघांनी प्रत्येकी १-१ सामन्यात विजय मिळवला आहे, तर १-१ सामन्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. व्हेलॉसिटी संघाला ट्रेलब्रेझर्स संघाने हरवले आहे तर सुपरनोव्हास संघाला व्हेलॉसिटी कडून पराभव पत्करावा लागला आहे.
जेव्हा साखळी फेरीत दोन्ही संघ आमनेसामने आले तेव्हा विजय व्हेलॉसिटी संघाने मिळवला होता. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर हा सामना झाला. प्रथम फलंदाजी करताना सुपरनोव्हासने १५० धावा केल्या. प्रत्युत्तरात १५१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना व्हेलॉसिटीने ७ गडी राखून विजय मिळवला. व्हेलॉसिटीतर्फे शेफाली वर्मा आणि लॉरा वूल्फर्ट यांनी अर्धशतके झळकावली. सुपरनोव्हासकडून कर्णधार हरमनप्रीत कौरने शानदार खेळी केली होती.
Final. Velocity won the toss and elected to field. https://t.co/cNivlqQgP2 #My11CircleWT20C
— IndianPremierLeague (@IPL) May 28, 2022
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
सुपरनोव्हा – : प्रिया पुनिया, डिआंड्रा डॉटिन, हरलीन देओल, तानिया भाटिया (विकेटकीपर), हरमनप्रीत कौर (कर्णधार), सून लुस, पूजा वस्त्राकर, अलाना किंग, सोफी एक्लेस्टोन, मनसी जोशी आणि राशी कनोजीया.
व्हेलॉसिटी – : शेफाली वर्मा, नट्टाकन चांटम, यास्तिका भाटिया (विकेट कीपर), लॉरा वॉलवर्ड, दीप्ती शर्मा (कर्णधार), किरण प्रभू, स्नेह राणा, राधा यादव, सिमरन बहादुर, अयाबंगा खाका आणि केट क्रॉस.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
