Share

‘महिलांनो सावध राहा, ठाकरे सरकारमध्ये सगळेच रणजीत’

Published On: 

मुंबई : मुंबईतील एका महिला मानसोपचार तज्ज्ञाने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर काही गंभीर आरोप केल्याचा प्रकार समोर आला आहे. या महिलेने मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. गेल्या सात वर्षांपासून संजय राऊत आपला छळ करत आहेत, असा गंभीर आरोप या महिलेने याचिकेत केलेला आहे. संजय राऊत यांनी आपल्या मागे पाळत ठेवण्यासाठी माणसं लावली होती, हेरगिरी करणं, जीवानिशी मारण्याचा प्रयत्न करणे, शिवीगाळ करणं, धमक्या देणे असे अनेक गंभीर आरोप महिलेने केले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते निलेश राणे यांनी महाविकास आघाडीवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

”ठाकरे सरकारमध्ये सगळेच रणजीत आहेत. जुन्या पिक्चरमध्ये जेव्हा अभिनेता रणजीत पिक्चरमध्ये एंट्री करायचा तेव्हा सगळ्यांना माहित असायचं हा कुठल्या तरी महिलेवर अत्याचार करणार तशीच ठाकरे सरकारबद्दल समज झाली आहे लोकांची. महिलांनो सावध रहा, ठाकरे सरकार आहे ” अशा आशयाचे ट्विट निलेश राणे यांनी केले आहे.

राज्यातील महिला अत्याचारांच्या मुद्द्यावरून भाजप नेहमीच महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल करत आहे. महाविकास आघाडीतील मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने अत्याचाराचा आरोप केला होता. तसेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी मेहबूब शेख यांच्यावरही एका महिलेवर अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल आहे. त्यानंतर आता शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचा पूजा चव्हाणच्या आत्महत्येत सहभाग असल्याचा आरोप होतोय. यामुळे राणे यांनी टाईमिंग साधत ठाकरे सरकारला रणजीतची उपमा दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!