उस्मानाबाद : जिल्ह्यात अवैध दारू विक्री जोमाने सुरू आहे. मात्र, याकडे प्रशासनातील काही अधिकारी ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. अवैध धंद्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. या प्रकाराला नागरिकही वैतागले आहे. असाच काहीसा प्रकार उस्मानाबाद तालुक्यातील चिखली चौक येथे घडला आहे.
अवैध दारू विक्रीप्रकरणी तक्रार केल्याने एका बिअरबार मालकाला ढाबाचालकाने मारहाण करून धमकावले. तसेच बारमालक पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास जात असताना पुन्हा त्याला अडवून मारहाण करत कारची काच फोडली. फिर्यादी राजेंद्र आवटे यांचे चिखली येथे परवानाप्राप्त हॉटेल व बिअरबार आहे. तसेच आवटे हे बिअरबार असोसिएशनचे तालुकाध्यक्षही आहेत. कांही दिवसांपूर्वीच त्यांनी उस्मानाबाद तालुक्यात अवैध दारूविक्री मोठ्या प्रमाणात होत असून याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी पोलिसांसह जिल्हा प्रशासनाकडे केली होती.
याचाच राग मनात धरून चिखली येथील लोकसेवा ढाबाचे मालक रमन नवनाथ ढवळे व इतर दोघांनी आवटे यांना आमच्या विरोधात तक्रार देतो का असे म्हणत काठीने मारहाण केली. या घटनेनंतर आवटे याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी कारने जात असताना पुन्हा वरील आरोपींनी त्यांना अडवून मारहाण करत कारच्या काचा फोडून तक्रार दिल्यास वाईट परीणाम होतील असे धमकावल्याचे आवटे यांनी तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी ढवळेसह इतर दोघांवर बेंबळी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील अनेक बारमधून दारूविक्री होण्याऐवजी तेथेच बसून दारू प्यायला जागा उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे नियमांचेही उल्लंघन होत आहे. शिवाय दारू पिणारे व्यक्ती परिसरातच गोंधळ घालतात. याला नागरिक वैतागले आहेत. याकडे पोलिसांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सावधान! ‘या’ रुग्णांची माहिती लपवल्यास होणार २ वर्षांचा कारावास
- याजसाठी केला होता अट्टाहास, पण शेवट वाईट झाला! चित्रा वाघ यांचा भाजप प्रवेश निष्फळ?
- खाम स्वच्छता मोहीम,नव्या ‘स्मार्ट’ सीईओंची अनुपस्थिती
- जालन्यात कोरोनामुळे चौघांचा मृत्यू; १७१ नव्या बाधित रुग्णांची नोंद
- मिळालेला निधी खर्च करण्यासाठी लगीनघाई; पण तांत्रिक अडचणीमुळे रखडली कामे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
