Share

याजसाठी केला होता अट्टाहास, पण शेवट वाईट झाला! चित्रा वाघ यांचा भाजप प्रवेश निष्फळ?

Published On: 

औरंगाबाद : भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाणच्या प्रकरणावरून शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्याविरोधात रान पेटवले होते. मात्र, आता त्यांच्याच पतीवर गुन्हा दाखल झाल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे.

चित्रा वाघ या पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत्या. त्यांच्या लाच मागितल्या प्रकरणी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकाळातच त्यांची चौकशी सुरू झाली होती. म्हणजेच २०१६ साली. या चौकशीमुळे तत्कालीन राष्ट्रवादीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी भाजप सरकारवर टीकाही केली होती. मात्र, चौकशीचा ससेमिरा वाढतच गेला. या प्रकरणाने किशोर वाघ तेव्हाच अडचणीत येणार होते. पर्यायाने चित्रा वाघ यांच्याही हे प्रकरण चांगलेच अंगलट आले असते. त्यामुळे आणि अन्य इतर काही कारणांनी चित्रा वाघ यांनी ३१ जुलै २०१९ रोजी भाजपमध्ये प्रवेश केल्याची चर्चा रंगली.

‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गटबाजीचं राजकारण नाही. चित्रा वाघ या गटबाजीमुळे नाराज होऊन पक्ष सोडून गेल्या यात तथ्य नाही. ईडीच्या चौकशीचा ससेमिरा टाळण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला असावा’, असे शरद पवार त्यावेळी म्हणाले होते.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजप व शिवसेनेत जाणाऱ्यांची रांग लागली होती. पूर्वीश्रमीच्या अखिल भारतीय सेनेतून राजकीय कारकीर्द सुरु करणाऱ्या चित्रा वाघ यांनीही भाजपची वाट धरली. चित्रा वाघ यांचा राजीनामा हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला गेला. राष्ट्रवादीत असताना चित्रा वाघ या महिला प्रदेशाध्यक्ष होत्या. वाघ यांनी राजीनामा दिल्यानंतर पुण्यातील रुपाली चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आली.

दरम्यान, आता महाविकास आघाडी सरकारच्या काळात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने किशोर वाघ यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तेही चित्रा वाघ यांनी राज्य सरकारविरोधात हल्लाबोल करत असतानाच. पतीवर गुन्हा दाखल झाल्याने चित्रा वाघ चांगल्याच संतापल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!