मुंबई : पूजा चव्हाणच्या आत्महत्येमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचा प्रकरणातील सहभाग पाहून भाजपने शिवसेनेविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. यातून भाजपला महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याचे आयते कोलीत मिळाले आहे. परंतू एरवी कंगना राणावत सारख्या किरकोळ प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करणारे केंद्र सरकार पूजाबाबत गप्प का असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
मात्र, सुत्रांच्या माहितीनूसार एक नवीन गोष्ट समोर आली आहे. आत्महत्येप्रकरणी अद्यापही पोलीस ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचले नाहीयेत. त्यामुळे या प्रकरणाचा केंद्रीय तपास यंत्रणेद्वारे नव्याने तपास केला जाण्याची शक्यता आहे. भाजपने तीव्र मागणी करूनही राज्य सरकारने तपासाबाबत संयमी भूमिका घेतली आहे. पोलीस तपासात दिरंगाई करत असल्याचा आरोप आरोप करत विरोधी पक्षाने केला आहे. त्यामुळे राज्यात विरोधात आणि केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपने थेट केंद्रीय यंत्रणाकडून तपासासाठी कामाला लावल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
पूजाच्या आत्महत्येचे ठिकाण आणि संजय राठोड यांचा यात सहभाग याबाबत केंद्रीय तपास यंत्रणांमार्फत नव्याने अभ्यास केला जाणार आहे. याशिवाय यवतमाळ शासकीय रुग्णालयात गर्भपात झालेली पूजा अरूण राठोड कोण? गर्भपात झाला त्यावेळी कर्तव्यावर असलेले विभागप्रमुख डॉ. रोहिदास चव्हाण अचानक रजेवर का गेले ? तसंच पुणे पोलिसांनी डॉ.चव्हाण यांचा जबाब नोंदवलाय का? पुजा चव्हाणने आत्महत्या केली त्यावेळी तिच्यासोबत असलेले दोघे तरूण कोण आणि त्यांचा आरोप असलेल्या मंत्र्यांशी संबंध काय? अशा अनेक मुद्द्यांवर तपास होणारे.
पूजा चव्हाणच्या आत्महत्येप्रकरणी पुण्याच्या वानवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद आहे. महिना होत आला तरी पुणे पोलिसांनी अद्याप कोणत्याही प्रकारचा ठोस तपास केला नसल्याचे चित्र आहे. यामुळे भाजपने यात दखल घेतल्याचे कळतंय.
महत्त्वाच्या बातम्या
- औरंगाबाद शहराची निवडणूक ‘ऐतिहासिक’ करण्याचा भाजपचा प्रयत्न
- ‘यांच्या जागी तुमची मुले असती तर काय केले असते?’ जितेंद्र आव्हाडांचा सवाल
- चंद्रकांत पाटलांनी घेतलेल्या ‘त्या’ निर्णयावर बीडचे राजकीय भवितव्य अवलंबून!
- दारू विकणाऱ्यानेच दिली दारू विक्रीची तक्रार, मग काय? खाल्ला मार!
- याजसाठी केला होता अट्टाहास, पण शेवट वाईट झाला! चित्रा वाघ यांचा भाजप प्रवेश निष्फळ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
