पुणे : राज्यामध्ये सध्या लोडशेडिंग सुरू आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे. देशपातळीवर कोळशाची सध्या टंचाई आहे. त्यामुळे छत्तीसगडमधील खाण घेण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. यासाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत देखील प्रयत्न करत असताना पाहायला मिळत आहेत. सोनिया गांधींनी देखील यामध्ये छत्तीसगड राज्य सरकारला याविषयीची विनंती केली आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
“कोणत्याही राजकीय पक्षाच्या व्यक्तींनी मत व्यक्त करत असताना कुठल्या समाजाबद्दल, घटकाबद्दल अपमान होईल किंवा नाराजी वाढेल, असे न करता तारतम्य बाळगूनच वक्तव्ये केली पाहिजेत”, असे पत्रकार परिषदेत बोलत असताना अजित पवार यांनी अमोल मिटकरींना यावेळी टोला लगावला आहे. तसेच देशभर सध्या कोळशाचा तुटवडा आहे. यामुळे राज्यांना योग्य प्रमाणात त्याचा पुरवठा होत नाही. देशभर कोळसाटंचाई आहे, हे सत्य असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.
“बदल्यांच्या संदर्भात मुख्यंमंत्री आणि गृहमंत्र्यांनी निर्णय घेतला आहे. बदल्या, पदोन्नती यासाठी समिती असते. ती निर्णय घेत असते. मात्र, तरीदेखील मुंबईला गेल्यावर यासंदर्भात माहिती घेणार असल्याचे ते म्हणाले. पीएमपीएमएल संपाविषयी मी आयुक्तांशी सकाळी बोललो आहे. दुपारपर्यंत त्यांचे पैसे जातील, पीएमपीएमएलकडे खासगी ठेकेदारांचे पैसे थकल्यामुळे हा बंद पुकारण्यात आला आहे. यामुळे सीएनजी आणि इलेक्ट्रिक बस डेपोत आहेत, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
