Share

अन् अजित पवार पत्रकारांवर चिडले! म्हणाले, “कॅमेऱ्यासमोर बोलणं बंद करेन”

Published On: 

🕒 1 min read

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे वारंवार पत्रकारांवर रागवताना दिसून येतात. पत्रकार हे अजित पवार यांना चालू घडामोडींवर प्रश्न विचारत असतात. कोणी काय म्हणालं? कोणी काय राजकीय प्रतिक्रिया दिली? याबाबत अजित पवार यांना पत्रकार प्रश्न विचारतात. त्यामुळे अजितदादा अनेकदा चिडलेले, रागावलेले दिसून येतात. अनेकदा अजित पवारांनी पत्रकारांना जाहीर समज दिलेली आहे. तरीही पत्रकार त्यांना तेच प्रश्न विचारतात. आज ही त्यांचा पारा चढलेला दिसून आला. पुन्हा एकदा अजित पवार यांच्या संतापाचा प्रत्यय आला. पत्रकारांनी त्यांना अमोल मिटकरी बाबत प्रश्न विचारला आणि त्यांचा पारा चढला. “तुम्ही मला वाटेल ते प्रश्न विचारू नका, नाहीतर मी तुमच्या कॅमेऱ्यासमोर बोलणं बंद करेन,” असे अजित पवार संतप्त होऊन म्हणाले. त्यामुळे आता पुढे काय आणि कसं विचारावं अशी पत्रकारांची गोची झाली.

अजित पवार हे पुण्यात आहेत. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलताना, वीज संकट, कोळश्याचा तुटवडा, भारनियमन, केंद्र सरकारशी चर्चा, मंत्रिमंडळाचे निर्णय यावर भाष्य केले. ही माहिती दिल्यानंतर पत्रकारांनी त्यांना राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या ताज्या विधानाच्या वादावर प्रश्न विचारले. त्यावर अजित पवार संतापले.

“तुम्हाला किती वेळा सांगितलं, कोणी काय म्हणालं त्यावर मला काही विचारू नका. मला विकासाचं विचारा मी बोलायला तयार आहे. पण तुम्ही नको ते विचारल्यावर, तुमच्या कॅमेऱ्यासमोर बोलायचं बंद करेन.” असे अजितदादा संतप्त होत म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!