🕒 1 min read
मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) आगामी नागपूर पालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis ) यांच्यावर निशाणा साधत “दुर्देवाने तुम्हाला सुबुद्धी आली नाही आणि म्हणूनच तुमचं मुख्यमंत्रीपद गेलं”, अशी टीका केली होती. यावरच आता भाजप नेते राम सातपुते यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
“आयुष्यभर मातोश्री वरचे धुणे भांडे करून तुम्हाला थोडी तरी सुबुद्धी असेल असा आमचा गैरसमज होता. आदरणीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांनी आयुष्यभर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा विरोध केला पण त्यांच्या सोबत तुम्ही सरकार बनवलं. जनाची नाही मनाची तरी ठेवायची की.”, असा टोला राम सातपुते यांनी ट्वीट करत लगावला आहे.
आयुष्यभर मातोश्री वरचे धुणे भांडे करून तुम्हाला थोडी तरी सुबुद्धी असेल असा आमचा गैरसमज होता.आदरणीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांनी आयुष्यभर कांग्रेस आणि राष्ट्रवादी चा विरोध केला पण त्यांच्या सोबत तुम्ही सरकार बनवलं .
जनाची नाही मनाची तरी ठेवायची की .@rautsanjay61 @Dev_Fadnavis pic.twitter.com/Z15dQIo7gs— Ram Satpute (@RamVSatpute) April 22, 2022
काय म्हणाले होते संजय राऊत?
“दुर्देवाने तुम्हाला सुबुद्धी आली नाही आणि म्हणूनच तुमचं मुख्यमंत्रीपद गेलं. जर तुम्हाला त्यावेळी सुबुद्धी आली असती की, शिवसेना हा आपला मित्र पक्ष, हिंदुत्ववादी पक्ष आहे. आपण त्या मैत्रीच्या नात्याने राहिलं पाहिजे तर आज आपण कदाचित मुख्यमंत्री असता. पण तुम्हाला दुर्बुद्धी सुचली आणि आम्हाला सुबुद्धीची अक्कल तुम्ही देत आहात.”, असा टोला संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. या अगोदर देवेंद्र फडणवीस यांनी “नागपूरच्या मातीमध्ये एक वेगळेपण आहे. ते नागपूरला वारंवार आले, तर त्यांना थोडी सुबुद्धी येईल”,असा टोला संजय राऊत यांना लगावला होता.
महत्वाच्या बातम्या:
- “राणा दाम्पत्य हे भाजपच्या नौटंकी मधील पात्र आहे”- संजय राऊत
- अन् अजित पवार पत्रकारांवर चिडले! म्हणाले, “कॅमेऱ्यासमोर बोलणं बंद करेन”
- “ते हिंदू आणि आम्ही काय मग…”- यशोमती ठाकूर
- “…तर फडणवीस आजही मुख्यमंत्री असते”- संजय राऊत
- “राजकीय हेतूने पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांची बदली”; राहुल डंबाळे यांचा आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
