Share

संजय राऊतांच्या सभेसाठी वीज चोरी, पक्षांतर्गत चौकशीची सारवासारव!

Published On: 

नागपूर : शिवसेना आणि महाविकास आघाडीचा किल्ला जोरदारपणे लढवणाऱ्या संजय राऊत यांची सभा काल नागपूर येथे झाली. दक्षिण नागपूर परिसरात गजानन नगर येथे झालेल्या सभेमध्ये आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने संजय राऊत यांनी शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र संजय राऊत यांच्या याच सभेसाठी आयोजकांनी मंचाच्या डाव्या बाजूला असणाऱ्या खांबावरच्या विजेच्या तारेवर तार टाकून वीज चोरल्याचे समोर आले आहे. तसेच मंचाच्या समोरील बाजूस बसलेल्या श्रोत्यांच्या उजवीकडील खांबावरून ही तशाच पद्धतीने तार टाकून वीज चोरल्याचे दिसून आले. त्यामुळे एकीकडे वीजटंचाईमुळे राज्य भारनियमाच्या संकटातून जात असताना, राजकीय पक्षांना वीजसंकटाशी काही देणे घेणे नाही का ? असा प्रश्न निर्माण होत आहे.

संजय राऊत म्हणाले, “मुंबईत बसत असलो तरी, नागपूरवर विशेष लक्ष असतं. नागपूरकर आता मुंबईकर झाले आहेत त्यांची संपत्ती मुंबईत आहे. त्यांना आता मुंबई सोडायची नाही. आता नागपूर मनपाचा रोज एक भ्रष्ट्राचार बाहेर काढू. अशी अनेक प्रकरणं आपल्याकडे आली आहेत. आता यांच्यावर ईडी लावायला पाहिजे. हे आमच्यावर ईडी लावतात, महापालिकेमधील घोट्याळ्यामुळे अनेकजण जेलमध्ये जातील.”

मात्र संजय राऊत यांच्याच सभेत विद्युत नियोजनासाठी वीजचोरी करण्यात आल्याचे समजतात, राऊत यांनी या प्रकरणी सारवासारव केली. सभेसाठी वीजचोरी या प्रकरणावर राऊतांना प्रश्न विचारले असता, संजय राऊत म्हणाले, “वीजचोरीच्या मुद्द्यावर पक्षांतर्गत चौकशी केली जाईल.” राऊत यांनी या प्रकरणावर अधिक काही बोलण्याचे टाळत, सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

महत्त्वाच्या बातम्या : 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!