🕒 1 min read
मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सीएनजीवरील व्हॅट १३.५ टक्क्यांवरुन कमी करुन तीन टक्क्यांवर आणला होता. १०.५ टक्क्यांची कपात अजित पवारांनी जनतेचे हित लक्षात घेऊन केली होती. मात्र केंद्र सरकारला महाराष्ट्रातील जनतेला सीएनजी स्वस्तात उपलब्ध व्हावा हे बहुधा रुचलेले दिसत नाही. आजपासून केंद्र सरकारने ११० टक्क्यांनी नैसर्गिक वायुचे दर वाढविले आहेत. मुंबईत आज सीएनजी ७ रुपये तर पीएनजीमध्ये ५ रुपयांची दरवाढ लागू करण्यात आली आहे. असे राष्ट्रवादीचे म्हटले आहे.
मुंबईत सीएनजीमध्ये ७ रुपयांची वाढ केल्यामुळे आता ६० रुपयांना मिळणारा सीएनजी प्रतिकिलो ६७ रुपये झाला आहे. तर पीएनजीमध्ये ५ रुपयांची वाढ झाल्यामुळे ३६ रुपयांचा पीएनजी आता प्रतिकिलो ४१ रुपयांवर गेला आहे. पेट्रोल-डिझेलचे दर कमी व्हावेत म्हणून राज्यातील भाजपचे नेते हे सातत्याने महाविकास आघाडीला व्हॅट कमी करण्यास सांगत आहेत. संपूर्ण देश इंधन दरवाढीसाठी केंद्र सरकारला जबाबदार धरत असताना राज्यातील भाजप नेते राज्य सरकारकडेच शहाजोगपणे जबाबदारी ढकलत होते.
आता सीएनजीवरील व्हॅट राज्याने कमी करुन देखील त्यावर पुन्हा कर लादून सीएनजी-पीएनजी महाग करणाऱ्या केंद्र सरकारला राज्यातील भाजप नेते जाब विचारणार का? असा सवाल राष्ट्रवादीने ट्वीट करत केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
“संजय राऊतांनी एक हाक द्यावी, शिवसैनिक रस्त्यावर उतरतील” – वरुण सरदेसाई
IPL 2022: ऑरेंज- पर्पल कॅपची संगीत खुर्ची सुरूच; विजयानंतर आरसीबीचे खेळाडू एक पाऊल पुढे
रणबीर सोबतच्या अफेअर्सविषयी आलियाची रोखठोक प्रतिक्रिया
IPL 2022: RCB vs RRसामन्यात मैदानावर थिरकले सिराज-कोहली; VIDEO एकदा पाहाच!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
