मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांची काल (५ एप्रिल) ईडीने मुंबई आणि अलिबागमधील मालमत्ता जप्त केली आहे. यानंतर राऊत यांनी थेट INS विक्रांत प्रकरणाबाबत मोठा खुलासा करत भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. आयएनएस विक्रांतसाठी किरीट सोमय्यांनी कोट्यवधी रुपये जमा केले. त्यासाठी लाखो लोकांनी पैसे दिले. स्वतः किरीट सोमय्यांनी 57 कोटी रुपये जमा केले. पण हे पैसे राजभवनात जमा झालेच नाहीत. असा आरोप राऊत यांनी केला आहे. यावरच आता राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी भाजपला सल्ला दिला आहे.
“हा पैसा नेमका कुठे घालवला? हे जरा महाराष्ट्राला कळू द्यात. आयएनएस विक्रांत च्या नावाखाली गोळा केलेल्या पैशाचा हिशेब सोमय्या काकांनी द्यावा. आणि केंद्रसरकारने पक्ष स्थापनेच्या दिनी या महाशयांना गांभीर्याने घ्यावे, नाहीतर एकदिवस हे तुमचा पक्षच भंगारात काढतील.”, असा टोला मिटकरी यांनी ट्वीट करत लगावला आहे.
आज भाजप पक्षाचा ४२ वा स्थापना दिवस आहे.आजच संजय राऊत यांनी हा मोठा खुलासा केला आहे. दरम्यान संजय राऊतांच्या आरोपाला किरीट सोमय्या यांनी उत्तर दिले. “ईडीच्या कारवाईमुळे संजय राऊत गोंधळलेले आहेत. मी काही केले असेल, तर त्याचे पुरावे संजय राऊतांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना द्यावे. त्यांनी अनेक आरोप केले. पण त्यांना पुरावे मिळालेच नाहीत. ते फक्त टाइमपास करू इच्छितात.”, असे सोमय्या यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
“…तर लोक नागडं करून मारतील…”, संजय राऊतांचा INS विक्रांत प्रकरणी सोमय्यांना इशारा
“…तर लोक नागडं करून मारतील…”, संजय राऊतांचा INS विक्रांत प्रकरणी सोमय्यांना इशारा
सोमय्यांनी ‘विक्रांत’साठी जमवलेला पैसा गेला कुठे ?
“काश्मीर फाईल्स पाहून झाली असेल तर आता INS विक्रांत फाईल पाहा”, राऊतांचा मोदी-शाहांवर निशाणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

