Share

रणबीर सोबतच्या अफेअर्सविषयी आलियाची रोखठोक प्रतिक्रिया

Published On: 

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या सर्वाधिक चर्चेत असलेली जोडी म्हणजे अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट. या लग्नाबाबत रणबीर किंवा आलियाकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही. मात्र याच महिन्यात हे दोघं लग्नबंधनात अडकणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. गेल्या काही वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत.

अभिनेत्री सोनम कपूरच्या लग्नात जेव्हा या दोघांनी फोटोग्राफर्ससमोर एकत्र हजेरी लावली, तेव्हापासून त्यांच्या अफेअरच्या चर्चांना सुरुवात झाली. आलियाच्या आधी रणबीरचं नाव काही अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होते .यामध्ये सोनम कपूर, दीपिका पदुकोण, कतरिना कैफ यांचा समावेश होता.

आलियाने एका मुलाखतीत रणबीरच्या भूतकाळातील अफेअर्सविषयी सांगितले. यावेळी तिने रणबीरसोबतच्या लग्नाबद्दलही भाष्य केलं. या मुलाखतीत आलिया म्हणाली, “रणबीर हा अत्यंत साधा व्यक्ती आहे. त्याच्याशी जुळवून घेणं कठीण नाही. एक अभिनेता म्हणून तो उत्तम आहे. तो माणूस म्हणूनही इतका चांगला आहे की कधी कधी मला वाटतं, मी सुद्धा त्याच्याइतकी चांगली व्यक्ती होण्याचा प्रयत्न करावा.

माझ्यापेक्षा अनेकपटीने तो उत्तम आहे. लग्नाबद्दल विचारत असाल तर सध्या मी त्या चर्चांमुळे खूप वैतागले आहे. रोज सकाळी उठून मला माझ्याच लग्नाविषयीच्या बातम्या ऐकायला, वाचायला मिळतात. रणबीरला या गोष्टीची सवय झाली आहे.” रणबीरच्या भूतकाळाविषयी बोलताना ती पुढे म्हणाली, “त्याने काय फरक पडतो? एखाद्या व्यक्तीचा तो भूतकाळ आहे आणि त्याचा विचार मी इतका करत नाही. मी तरी कुठे कमी आहे!”

महत्वाच्या बातम्या :

PL 2022: RCB vs RRसामन्यात मैदानावर थिरकले सिराज-कोहली; VIDEO एकदा पाहाच!
“पक्ष स्थापनेच्या दिनी ‘या’ महाशयांना गांभीर्याने घ्या नाहीतर..”, राऊतांच्या आरोपानंतर अमोल मिटकरींचा भाजपला सल्ला
महाविकास आघाडीतून अखेर राजू शेट्टी बाहेर
घटस्फोटानंतर सामंथाने दिली खुशखबर, सोशल मीडियावर केली मोठी घोषणा
काँग्रेसकडून मनसे नगसेवक वसंत मोरे यांचे अभिनंदन!

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!