पुणे : ‘पुणे तिथे काय उणे’ असं उगाच म्हटलं जात नाही. ऐन थंडीच्या हंगामात पुण्यातील कोथरुड परिसरात चक्क एक गवा सोसायटीत आल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांनी धास्ती घेतली होती. अचानक गव्याचे दर्शन झाल्याने अनेकांची धावपळ उडाली होती.
गवा सदृश्य रानटी प्राणी सोसायटीत आल्याने सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे, असे स्थानिक नागरिकांनी सांगितले. पहाटे फिरण्यासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांना हे दृश्य दिसताच एकच धांदल उडाली. पहाटे साडेपाचच्या सुमारास हा प्रकार आढळून आला. गव्याचे वय सुमारे चार वर्षे असावे, असे सांगण्यात आले.
बिथरलेल्या रानगव्याला बेशुध्द करण्यासाठी वनविभागाकडे आवश्यक तेवढ्या प्रमाणात डोस उपलब्ध नसल्याने मदत कार्य रेंगाळले आहे. ज्यादा डोसची तजवीज करण्यात येत आहे. या परिसरात आता बघ्यांची गर्दी झाली आहे.दरम्यान, जंगलातून चुकल्यामुळे भिंतींना धडका देणारा रानगवा आता काहीसा शांत झाला असून एके ठिकाणी शांत उभा आहे.
दरम्यान भूलीच्या डोसची तजवीज करण्यात येत आहे. कोथरूडसारख्या शहरी ठिकाणी रानटी गवा कसा आला हा प्रश्न आता स्थानिकांच्या मनात आहे. वनविभागाच्या पथकाकडून या रानटी गव्याला पकडल्यानंतर या सर्व गोष्टींचा खुलासा होण्यास मदत होईल.
दरम्यान, गवा हा कोल्हापूर आणि राधानगरी परिसरात आढळून येतो असे सांगितले जाते. मात्र आता हा गवा पुण्यात आढळून आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, कोथरूडचे आमदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे निवास्थानही याच परिसरात आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘पुन्हा येईन म्हणणाऱ्यांचे दिवस संपले’; वडेट्टीवारांचा भाजपवर हल्लाबोल
- तृप्ती देसाईंना शिर्डीमध्ये प्रवेशबंदी! शिर्डी पोलीसांनी तृप्ती देसाईंना दिली नोटीस
- नवनवीन प्रगत व्यवसाय अभ्यासक्रम सुरु होण्यासाठी प्रयत्न करणार : शंभूराज देसाई
- आशा स्वयंसेविकांच्या प्रलंबित मागण्या आणि त्यांच्या मानधनाचा प्रश्नही तातडीने सोडवू : मुश्रीफ
- ज्या देशातील शेतकरी दुःखी, तो देश कधीच प्रगती करत नाही – उर्मिला मातोंडकर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

