🕒 1 min read
नगर : शिर्डीत साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना आता भारतीय संस्कृतीप्रमाणे पोषाख परिधान करावा लागणार आहे. अर्थात, याची सक्ती करण्यात आली नसून साईबाबा संस्थांनने भाविकांना अशी विनंतीवजा सूचना केली आहे.
संस्थानाच्या निर्णयानंतर भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी जोरदार टीका केली होती. ‘पुजारीही अर्धनग्न अवस्थेत असतात मग त्यांनाही मंदिरात प्रवेश नाकारणार का?’ असा सवाल करत त्यांनी शिर्डी संस्थानने घेतलेला निर्णय तातडीने मागे घेऊन जो बोर्ड लावला आहे तो त्वरित काढून टाकावा अन्यथा शिर्डी मध्ये येऊन आम्ही तो बोर्ड स्वतः काढू, असा इशारा त्यांनी दिला होता.
दरम्यान, श्रध्दा आणि सबुरी ही साईबाबांची शिकवण आहे म्हणूनच पुन्हा एकदा संस्थानला तृप्ती देसाई यांनी विनंती केली आहे की “आपण सदर बोर्ड तातडीने काढून टाकावा अन्यथा 10 डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता आम्हाला शिर्डीत येऊन तो बोर्ड काढावा लागेल.”
यानंतर, मोठं वादंग निर्माण झालं होतं. शिवसेनेसह भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने देखील साई संस्थानच्या निर्णयाला समर्थन दिलं होतं. तर, शिर्डीत येऊन काही स्टंटबाजी केली, तर त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा व ‘शिवसेना स्टाइल’ने उत्तर देण्याचा इशारा शिवसेना महिला आघाडीने दिला होता.
त्यामुळेच संभाव्य वादाची परिस्थिती बघता व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून तृप्ती देसाईंना शिर्डी हद्दीत प्रवेश करण्यास 8 डिसेंबर ते 11 डिसेंबर बंदी घालण्यात आली आहे. विभागीय दंडाधिकारी गोविंद शिंदे शिर्डी विभाग यांनी संबंधित आदेश दिले असून शिर्डी पोलीसांनी तृप्ती देसाईंना आदेशाची नोटीस देखील दिली आहे. याबाबत स्वतः तृप्ती देसाई यांनी ‘महाराष्ट्र देशा’ला माहिती दिली आहे.


महत्वाच्या बातम्या
- दिल्ली-महाराष्ट्राच्या लढाईत माझा तानाजी झालायं : प्रताप सरनाईक
- मन जिंकलस पांड्या! दिलदारी दाखवत पांड्याने ‘मॅन ऑफ दि सिरीज’ पुरस्कार नटराजनला दिला
- टी-२० मालिकेत ऑस्ट्रेलियाचा व्हाईटवॉश हुकला; भारताचा पराभव
- गेले दोन आठवडे ईडीला हुलकावणी देणारे सरनाईक सिद्धिविनायकाच्या दर्शनाला!
- ‘शेतकऱ्यांप्रमाणेच शिक्षित लोकं रस्त्यावर आले असते तर ना विमानतळं विकली गेली असती, ना…’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
