मुंबई : देशात शेतकरी आंदोलनावरून वातावरण पेटलं असताना राज्यात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा आरोप-प्रत्यारोपांचा सामना रंगल्याचं दिसून येत आहे. कृषी कायद्यांच्या विरोधातील आंदोलनाला काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने समर्थन दिलं असून आज राज्यात अनेक ठिकाणी या पक्षांनी आंदोलन देखील केल्याचं दिसून आलं.
दरम्यान, भाजपने हे आंदोलन शेतकऱ्यांसाठी नसून हे शेतकरी उपयोगी कायदे मोदी सरकारने आणल्याने त्याचा द्वेष केला जात असल्याचा आरोप करत हे पक्ष राजकीय पोळी भाजण्याचं काम करत असल्याचा आरोप केला आहे. यावरून काँग्रेसचे नेते व मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.
‘आम्ही येतो आम्ही येणार असे म्हणणाऱ्यांचे दिवस आता संपले आहेत. आता परत कधी येणार नाही, असं त्यांनी म्हणावे’ असा टोला त्यांनी भाजपसह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. ते न्यूज १८ लोकमतशी बोलत होते. ‘मोदी सरकारने केलेल्या काळ्या कायद्याच्या विरोधात शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. संपूर्ण देश हा शेतकऱ्यांच्या पाठिशी उभा आहे. स्वामीनाथन आयोगाचा अहवाल प्रकाश जावडेकरांनी पूर्ण वाचला नाही. या आयोगाच्या अनेक प्रमुख शिफारशी आमच्या सरकारने स्वीकारल्या होत्या. गुजरातमध्ये मोदींनी सांगितले होते की, msp ला धक्का लावला जाणार नाही. पण नव्या कायद्यात msp चा उल्लेख केलेला नाही’ अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
महत्वाच्या बातम्या
- दिल्ली-महाराष्ट्राच्या लढाईत माझा तानाजी झालायं : प्रताप सरनाईक
- मन जिंकलस पांड्या! दिलदारी दाखवत पांड्याने ‘मॅन ऑफ दि सिरीज’ पुरस्कार नटराजनला दिला
- टी-२० मालिकेत ऑस्ट्रेलियाचा व्हाईटवॉश हुकला; भारताचा पराभव
- गेले दोन आठवडे ईडीला हुलकावणी देणारे सरनाईक सिद्धिविनायकाच्या दर्शनाला!
- तृप्ती देसाईंना शिर्डीमध्ये प्रवेशबंदी! शिर्डी पोलीसांनी तृप्ती देसाईंना दिली नोटीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

