Share

Zika Virus | पुण्यात सापडला झिका व्हायरसचा रुग्ण, प्रकृती उत्तम असल्याची मिळाली माहिती

Published On: 

Zika Virus | पुणे: महाराष्ट्रमध्ये पुणे (Pune) शहरात झिका व्हायरस (Zika Virus) रुग्ण आढळला आहे. 67 वर्षीय व्यक्तीला या विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. ही व्यक्ती नाशिकची रहिवासी असून 6 नोव्हेंबर रोजी पुण्यात आली होती. नोव्हेंबर पासून त्या व्यक्तीला ताप खोकला सांधेदुखी आणि थकवा इत्यादी गोष्टी जाणवत होत्या. त्यानंतर तो जहागीर रुग्णालयात दाखल झाला होता. 18 नोव्हेंबर रोजी खाजगी प्रयोगशाळेत चाचणी केल्यानंतर त्याला झिका झाल्याचे निदान झाले होते. ती झिकाग्रस्त व्यक्ती आता पूर्णपणे बरी झालेली आहे.

महाराष्ट्र आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नाशिक येथील रहिवासी असलेल्या या व्यक्तीला गेल्या महिन्यात हा संसर्ग झाला होता. संसर्ग होण्याच्या आधी ही व्यक्ती गुजरात राज्यातील सुरत शहरात गेली होती. सहा नोव्हेंबरला ती व्यक्ती पुण्यात बावधन भागात आली होती. त्यानंतर त्याला ताप, खोकला, सांधेदुखी, थकवा इत्यादी गोष्टी जाणवायला लागल्यानंतर पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. 18 नोव्हेंबर रोजी खाजगी प्रयोगशाळेत चाचणी केल्यानंतर त्याला झिका व्हायरसची लागण झाल्याची माहिती समोर आली.

पुणे शहरांमध्ये स्थित असलेल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरलॉजी (NIV) येथे झालेल्या चाचणीतरी झिका व्हायरसची पुष्टी करण्यात आली आहे. चाचणीच्या अहवालानुसार, आरोग्य विभागाने पुणे शहर आणि बावधन परिसरात सखोल सर्वेक्षण केले आहे.

पुण्याआधी जुलैमध्ये पालघर जिल्ह्यातील सात वर्षाच्या मुलीला या विषाणूची लागण झाली होती. डेंगू, मलेरियाप्रमाणे जिका विषाणू देखील ॲडीज डासाच्या चाव्याद्वारे पसरतो.1947 मध्ये आफ्रिकन देश युगांडामध्ये या विषयाची सर्वप्रथम ओळख निर्माण झाली होती. 2016 च्या उद्रेकानंदर ब्राझीलमध्ये देखील हा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरला होता. त्यानंतर हा एक सार्वजनिक आरोग्य रोग मानला जात आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!