Share

आशा स्वयंसेविकांच्या प्रलंबित मागण्या आणि त्यांच्या मानधनाचा प्रश्नही तातडीने सोडवू : मुश्रीफ

Published On: 

🕒 1 min read

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यातील आशा स्वयंसेविकांना दिलेले कार्यमुक्तीचे आदेश तातडीने मागे घ्या, अशा स्पष्ट सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमन मित्तल यांना ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या. आशा स्वयंसेविकांच्या प्रलंबित मागण्या आणि त्यांच्या मानधनाचा प्रश्नही तातडीने सोडवू असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले.

याबाबत अधिक माहिती अशी, कुष्ठरोग व क्षयरोग सर्वेसाठी प्रतिरुग्ण 50 रुपये एवढा मोबदला कमी वाटत असल्यामुळे आशा स्वयंसेविकानी हा सर्वेच नाकारला होता. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मित्तल यांनी जिल्ह्यातील आशा स्वयं सेविकांना कार्यमुक्तीचे आदेश दिले होते. यामुळे संतप्त झालेल्या आशा स्वयंसेविकानी सेंटर ऑफ इंडिया ट्रेड युनियन म्हणजेच सिटू अंतर्गत कोल्हापूर जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियनच्या माध्यमातून भेट घेतली व कैफियत मांडली.

यावेळी सिटूचे कार्याध्यक्ष काॅम्रेड चंद्रकांत यादव, जिल्हाध्यक्ष कॉम्रेड भरमा कांबळे, जिल्हा सहसचिव कॉम्रेड शिवाजीराव मगदूम, आशा युनियनच्या जिल्हा सचिव सौ. उज्वला पाटील, खजिनदार सौ. संगीता पाटील, सारिका पाटील, मंदाकीनी कोडक, माया पाटील, मनीषा पाटील यांच्यासह स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

आशा स्वयंसेविकानी 2019 चा महापूर, महाआयुष, माझं कुटुंब- माझी जबाबदारी, आयुष्यमान भारत या सर्व योजनांमध्ये सर्वे काम करूनही मानधन मिळाले नसल्याची कैफियत मुश्रीफ यांच्यासमोर  मांडली. यावर तातडीने आरोग्य विभागाचे मुख्य सचिव प्रदीप व्यास यांना फोन करून या मानधनाबाबत विचारणा केली. त्यावेळी व्यास यांनी लवकरच हे पैसे वर्ग करून हा प्रश्न निकालात काढू, असे सांगितले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!