मुंबई : केंद्र सरकारने घाईघाईत पारित केलेल्या नव्या जाचक कृषी कायद्यांच्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. गेल्या 13 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही.
उद्या म्हणजेच डिसेंबरला शेतकरी आणि सरकार यांच्यात आणखी एक बैठक होणार आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या आजच्या ‘भारत बंद’ला काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह देशभरातील अनेक विरोधी पक्ष तसेच शेतकरी संघटनांनी समर्थन दिलं आहे. राज्यात या बंदला संमिश्र प्रतिसाद दिसून आला.
या आंदोलनावर नुकत्याच शिवसेनेमध्ये प्रवेश केलेल्या अभिनेत्या उर्मिला मातोंडकर यांनी देखील ट्विट करून भाष्य केलं आहे. ‘ज्या देशातील शेतकरी दुःखी, तो देश प्रगती करू शकत नाही,’ असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे. ‘भारत हा कृषिप्रधान देश आहे. लालबहादूर शास्त्री यांनी जय जवान, जय किसानचा नारा दिला. ज्या देशातील शेतकरी दु:खी आहे. तो देश कधीच प्रगती करु शकत नाही. त्या देशात नेहमीच अडचण होत राहणार,’ अशी रोखठोक प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली आहे.
जिस देश का #किसान दुखी
वह देश कभी “विकास” नहीं कर सकता#FarmersAreLifeLine #8_दिसम्बर_भारत_बन्द #BharatBandhOn8December2020 #किसान_एकता_जिंदाबाद #ISTANDWITHFARMER pic.twitter.com/LHdYKP3ytq— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) December 8, 2020
महत्वाच्या बातम्या
- दिल्ली-महाराष्ट्राच्या लढाईत माझा तानाजी झालायं : प्रताप सरनाईक
- शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार, राहुल गांधींसह पाच प्रतिनिधी घेणार राष्ट्रपतींची भेट!
- टी-२० मालिकेत ऑस्ट्रेलियाचा व्हाईटवॉश हुकला; भारताचा पराभव
- गेले दोन आठवडे ईडीला हुलकावणी देणारे सरनाईक सिद्धिविनायकाच्या दर्शनाला!
- दिलदार शेतकऱ्यांचा मोठेपणा; आंदोलनात करून दिली रुग्णवाहिकेला वाट!


