Share

स्वयंपाक येत नसल्याने पत्नीला पेटवले, हिंगोलीतील घटना

Published On: 

🕒 1 min read

हिंगोली : वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथील विवाहितेचा पतीनेच हत्या करून मृतदेह नाल्यात फेकून दिल्याची घटना घडली. याप्रकरणी कुरूंदा पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात शुक्रवारी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथील संगीता रामा मारकळने पत्नीला दोष देत तू दिसायला सुंदर नाही, तुला स्वयंपाक येत नाही या कारणावरून नेहमी त्रास देत होता. तसेच तू काम करत नाहीस म्हणून संगिताला भांडत असे. वाद घालताना तुझा काटा काढतो असे नेहमीच म्हणत. गुरुवारी संगिताला पती रामाने एका बहाण्याने पांगरा शिंदे शिवारातील एका नाल्याजवळ बोलावून घेतले. तिथे तिला जबर मारहाण करून अंगावर ज्वलनशील द्रव्य टाकून जाळले.

या घटनेत संगिताचा मृत्यू झाला. त्यानंतर रामाने मृतदेह नाल्यात फेकून दिला. याप्रकरणी नानाराव भुरके यांनी कुरूंदा पोलीस ठाण्यात फिर्यादी दाकल केली. त्यावरून आरोपी रामा बाबुराव मारकळ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!