जालना : मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार उदासीन आहे. महाविकास आघाडी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच मराठा समाज आरक्षणापासून वंचित राहतोय अशी टीका शिवसंग्रामचे अध्यक्ष तथा आमदार विनायक मेटे यांनी केली. त्यामुळे अशोक चव्हाण, राजेश टोपे, अनिल देशमुख, नितीन राऊत, वर्षा गायकवाड, विजय वडेट्टीवार या मंत्र्यांच्या जिल्ह्यात त्यांच्या विरोधामध्ये जनजागृती मेळावे घेण्यात येणार असल्याची घोषणा मेटे यांनी केली.
मराठा आरक्षणावर राज्य तसेच केंद्र सरकारही वेळकाढूपणा करत आहे. यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगाव हे अख्खे गावच उपोषणाला बसले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसंग्रामचे अध्यक्ष तथा आमदार विनायक मेटे यांनी संवाद साधला. मराठा समाजाच्या विरोधात भूमिका घेत असलेल्या मंत्र्यांच्या जिल्ह्यात मेळावे घेण्यात येणार असल्याची माहिती दिली.
एमपीएससी सतत नवीन अटी मराठा समाजाच्या व खुल्या वर्गाच्या विरोधात पत्रक काढत असून, अटी लादत आहे. सर्वोच्च न्यायालयातही अर्ज करुन हद्द ओलांडली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये शिक्षणावरही बहिष्कार टाकण्यासाठी गावेच्या गावे पुढे येऊ लागली आहेत. यामुळे आरक्षणाचा प्रश्न अजून पेटण्याची आता चिन्हे निर्माण झालीत. त्यामुळे संताप व्यक्त करण्यासाठी मंत्र्यांच्या जिल्ह्यात त्यांच्याविरोधात जनजागृती मेळावे आयोजित करण्यात आले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘…म्हणून माझ्या मनात मोहम्मद सिराज बद्दल खूप सन्मान आहे’
- मराठा आरक्षणासाठी आगळेवेगळे आंदोलन
- नागपुरमध्ये शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर; नाराज शिवसैनिकांचे पक्षप्रमुखांना पत्र
- ‘धार्मिक तणाव निर्माण करणाऱ्या पक्षात काम करू करा’, रोहित पवारांचा सल्ला
- …आता तरी राणेंना सुखाने झोप लागेल; पवारांचा राणेंना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

