पुणे : गेल्या वर्षी कोरोना रोगाने हाहाकार माजवला होता. देशासह संपूर्ण जगाला कोरोनाने विळखा घातला होता. या रोगावर ठोस उपचार वा लस नसल्याने लाखो नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी मास्क, सॅनिटायझरचा वापर करणे हे महत्वाचे असल्याने सार्वजनिक ठिकाणी मास्क सक्ती करण्यात आली होती.
तर, चारचाकी वाहनातून प्रवास करताना देखील मास्क घालणे बंधनकारक करण्यात आलं होतं. मास्क न घालणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई देखील केली होती. पुण्यात देखील अनेक वाहनांवर कारवाई करण्यात आली होती. आता पुणेकरांना कुटुंबियांसोबत चारचाकी वाहनांतून प्रवास करताना मास्क गरजेचा नसल्याचे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी जाहीर केले आहे.
यासंदर्भात त्यांनी ट्विट करून देखील माहिती दिली आहे. ‘चारचाकी वाहनात कुटुंबियांसोबत प्रवास करताना मास्कची गरज नाही ! कुटुंबियांसोबत चारचाकी वाहताना पुणे महापालिका हद्दीतून प्रवास करताना आता मास्क परिधान करण्याची आवश्यकता नसेल. ही सवलत केवळ खासगी वाहनांसाठी असून यात प्रवास करणाऱ्या व्यक्ती कुटुंबातीलच असाव्यात !’ असं मुरलीधर मोहोळ म्हणाले आहेत. आता चारचाकी वाहनात मास्क घालणं गरजेचं नसलं तरी ते वाहन खाजगी असण्यासोबतच प्रवास करताना सोबतच्या व्यक्ती या कुटुंबातीलच असाव्यात अशी आत देखील घालण्यात आली आहे.
चारचाकी वाहनात कुटुंबियांसोबत प्रवास करताना मास्कची गरज नाही !
कुटुंबियांसोबत चारचाकी वाहताना पुणे महापालिका हद्दीतून प्रवास करताना आता मास्क परिधान करण्याची आवश्यकता नसेल. ही सवलत केवळ खासगी वाहनांसाठी असून यात प्रवास करणाऱ्या व्यक्ती कुटुंबातीलच असाव्यात !
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) January 22, 2021
महत्वाच्या बातम्या
- गेल्यावर्षी यूपीएससी परीक्षांमध्ये शेवटचा प्रयत्न केलेल्या विद्यार्थ्यांना वाढीव संधी नाहीच !
- काँग्रेसकडून प्रियांकांची ‘इमेज बिल्डिंग’; तब्बल १० लाख कॅलेंडरचे वाटप !
- मराठा आरक्षणासाठी मंत्र्यांच्या जिल्ह्यात घेणार मेळावे-आ.विनायक मेटे
- ‘धार्मिक तणाव निर्माण करणाऱ्या पक्षात काम करू करा’, रोहित पवारांचा सल्ला
- …आता तरी राणेंना सुखाने झोप लागेल; पवारांचा राणेंना टोला


