Share

वाई न्यायालयाकडून उदयनराजे भोसले यांना मोठा दिलासा

Published On: 

वाई : भाजप खासदार उदयनराजे भोसले हे त्यांच्या बेधडक वागण्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांचे वागणे त्यांच्यासाठीच अडचणीचे ठरत असल्याचे काही घटनांवरून समोर आले आहे. कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर वारंवार टीका केली जाते.

५ ऑक्टोबर २०१७ रोजी संध्याकाळी आनेवाडी टोल नाका येथे खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. यामुळे न्यायालयात गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी सुनावणी वाई येथील न्या एम एन गिरवलकर यांच्या न्यायालयात झाली आहे. अखेर आनेवाडी टोल नाका हस्तांतर आंदोलन प्रकरणाचा निकाल लागला आहे. वाई न्यायालयाने उदयनराजे भोसले यांची निर्दोष सुटका केली आहे. उदयनराजे यांची निर्दोष मुक्तता झाल्याचे समजल्यानंतर कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे

सुनावणीदरम्यान सहा साक्षीदार तपासण्यात आले होते. अंतिम सुनावणीनंतर उदयनराजे व त्यांच्या ११ सहकाऱ्यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. सुनावणीसाठी न्यायालयात उदयनराजे भोसले व त्यांचे सर्व सहकारी उपस्थित होते. सरकारी पक्षाच्या वतीने मिलिंद पांडकर यांनी तर उदयनराजे व इतरांच्या वतीने वकील ताहेर मनेर यांनी काम पाहिले होते.

उदयनराजे यांनी आनेवाडी टोल नाका येथे २५० जणांचा बेकायदेशीर जमाव जमवून टोलनाक्यावरील स्थानिक कामगारांचा व दिवाळी बोनसचा मुद्दा तसंच टोल वसुलीचा अधिकार कोणाला देणार नाही असे सांगून टोल हस्तांतरणास विरोध केला होता. त्यामुळे टोलनाक्यावर मोठा गोंधळ निर्माण झाला होता. या सर्व घटनेमुळे टोलनाका परिसरात तणावपूर्ण वातावरण झाल्यामुळे तेथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागला होता. याबाबत भुईंज पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल धनाजी तानाजी कदम यांनी पोलीस ठाण्यात बेकायदेशीर जमाव जमवून जिल्हाधिकारी आदेशाचा भंग केल्याची तक्रार दाखल केली होती.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!