मुंबई : वेस्टइंडीजने नेदरलँड्सविरुद्धची एकदिवसीय मालिका ३-० अश्या फरकाने जिंकली आहे. शनिवारी खेळलेल्या अंतिम सामन्यात वेस्टइंडीज संघाने यजमान संघाचा २० धावांनी पराभव केला. कायरन पोलार्डच्या निवृत्तीनंतर निकोलस पूरनला संघाचा नवा कर्णधार बनवण्यात आले. पुरनने त्याच्या कर्णधारपदाची विजयाने सुरुवात केली आहे. शेवटच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने ५ गडी गमावून ३०८ धावा केल्या होत्या. काइल मेयर्स आणि शेमराह ब्रूक्स यांनी शतके झळकावली. प्रत्युत्तरात नेदरलँडच्या फलंदाजांनी दमदार संघर्ष दाखवत संघाची धावसंख्या २८८ धावांपर्यंत पोहोचवली. पण त्यांना या सामन्यात विजय मिळवता आला नाही. मेयर्सला त्याच्या दमदार कामगिरीसाठी सामनावीर पुरस्कार मिळाला.
सामन्यात निकलस पूरनने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. शाई होप २४ धावा करून लवकरच बाद झाला. यानंतर काईल मेयर्स आणि शेमराह ब्रूक्स यांनी दुसऱ्या गड्यासाठी १८४ धावांची मोठी भागीदारी करत संघाची धावसंख्या २५० धावांच्या जवळ नेली. मेयर्सने १०६ चेंडूत १२० धावा केल्या. त्याने या खेळीत ८ चौकार आणि ७ षटकार मारले. ब्रुक्स ११५ चेंडूत १०१ धावा करून नाबाद राहिला. त्याने ३ चौकार आणि ४ षटकार मारले होते. तर बोनर १६ चेंडूत १९ धावा करून नाबाद राहिला.
3-0! A thrilling finish to the series! ????
Well played boys!???????? #NEDvWI pic.twitter.com/n87EwYLCBX
— Windies Cricket (@windiescricket) June 4, 2022
दोन्ही खेळाडूंनी ठोकले पहिले शतक
मेयर्स आणि ब्रूक्स या दोघांचे हे एक दिवसीय मधील पहिले शतक आहे. २९ वर्षीय मेयर्सचा हा सहावा एकदिवसीय सामना आहे. त्याने आतापर्यंत ३९ च्या सरासरीने १९३ धावा केल्या आहेत तर एक शतक झळकावले आहे. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट ८७ चा राहिला आहे. त्याने वेगवान गोलंदाजी करताना ४ बळीही घेतले आहेत. तर ३३ वर्षीय ब्रूक्सने आपल्या ९व्या एकदिवसीय सामन्यात पहिले शतक झळकावले. त्याने आतापर्यंत ४५ च्या सरासरीने ३६० धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने एक शतक आणि दोन अर्धशतके झळकावली आहेत.
MAIDEN TON!???? A fantastic innings by @kyle_mayers! #NEDvWI
Live Scorecard⬇️https://t.co/h2bfVuFQ7L pic.twitter.com/AWNy5xyLB2
— Windies Cricket (@windiescricket) June 4, 2022
प्रत्युत्तरात विक्रमजीत सिंग आणि मॅक्स डॉड यांनी नेदरलँडला दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या गड्यासाठी ९८ धावांची भागीदारी केली. विक्रमजीतने ५५ चेंडूत ५४ धावा केल्या. त्याला काइल मेयर्सने बाद केले. त्याने या खेळीदरम्यान ७ चौकार आणि १ षटकार मारला. तिसऱ्या क्रमांकावर उतरलेल्या मुसा अहमदनेही ४२ धावा केल्या. संघाची धावसंख्या एकावेळी २ बाद २०६ धावा अशी होती. मात्र शेवटी त्याचे फलंदाज एकापाठोपाठ एक बाद झाले. संपूर्ण संघ ४९.५ षटकांत २८८ धावा करून बाद झाला. शेमरन लुईसने ३ बळी घेतले. तर अकिल हुसेनने २ बळी घेतले. त्याने या मालिकेत सर्वाधिक ८ गडी बाद केल्याने तो मालिकावीर ठरला.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

