Share

“मराठी माणसाचा स्वाभिमान जपला” ; मनसे नेते अविनाश जाधव अयोध्येत दाखल

Published On: 

अयोध्या : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपण अयोध्या दौरा करणार असल्याचेजाहीर केले होते. मात्र उत्तर प्रदेशमधून राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला जोरदार विरोध झाल्यानंतर, प्रकृतीच्या कारणास्तव राज ठाकरेंनी आपला अयोध्या दौरा तुर्तास स्थगित करावा लागला. आता मात्र मनसेचे नेते अविनाश जाधव आणि कार्यकर्त्यांनी ठरलेल्या तारखेला म्हणजेच 5 जूनचा मुहूर्त चुकवला नाही आणि राम दर्शनाला ते अयोध्येत दाखल झाले आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केली, यानंतर त्यांना तेथील भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केलेला. जोपर्यंत उत्तर भारतीयांची माफी मागणार नाही तोपर्यंत अयोध्येत पाय ही ठेवू देणार नाही, असा इशाराच बृजभूषण सिंह यांनी दिला होता. राज ठाकरेंनी दौरा स्थगित केला असला तरी मनसे नेते अविनाश जाधव आणि मनसैनिकांनी बृजभूषण सिंह यांच्या विरोधाला न जुमानता अयोध्येत दाखल होऊन, रामाचं दर्शन घेतलं आहे.

मनसेचे ठाणे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांनी आज मनसेच्या कार्यकर्त्यांसह अयोध्येत दाखल होऊन रामाचं दर्शन घेतलं. यानंतर अविनाश जाधव यांनी अयोध्येतून एक व्हिडीओ शूट करुन आपल्या फेसबूकवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओत अविनाश जाधव यांनी म्हटलं, “आजची तारीख पाच जून. सन्माननीय श्री राजसाहेब यांचा अयोध्या दौरा होता काही कारणास्तव तो रद्द झाला पण त्यांच्या महाराष्ट्र सैनिकांनी तो पूर्ण केला मराठी माणसाचा स्वाभिमान जपला”.

https://www.facebook.com/avinashjadhavmnsofficial/posts/pfbid031itk6jD3UipZhAKyVmXHyMbHryuc6ehLLRkuDHHg7B2ZSQm8LgrT2yNdq8ZtoDvsl

अविनाश जाधव म्हणाले, “मी अविनाश जाधव मनसे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष. मी आत्ता आहे अयोध्येत. राम जन्मभूमीत आम्ही दाखल झालो आहोत. रामलल्लाचं दर्शन प्रत्येक हिंदूने घेतलं पाहिजे. आज मी इथे आलो आहे. मी प्रत्येक मराठी बांधवांना विनंती करतो की तुम्ही अयोध्येत श्रीरामाच्या दर्शनाला या. आज 5 तारीख आहे आणि एक मराठी माणूस अयोध्येत आला आणि त्याने श्रीरामाचं दर्शन घेतलं आहे.”

महत्त्वाच्या बातम्या : 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!