🕒 1 min read
मुंबई : काल (२४ मार्च) विधानसभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यातील सफाई कामगार, झोपडपट्टीवासीयांसह ३०० आमदारांना घरं देणार असल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर ठाकरे सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी प्रतिक्रिया दिली असून हा खर्च कुणाच्या सांगण्यावरून?, असा सवालही त्यांनी केला आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना संदीप देशपांडे म्हणाले की,‘सरकारला नेमकं साध्य काय करायचं आहे? तुमचं सरकार डळमळीत होतंय, म्हणून आमदारांना आमिष दाखवण्याचा हा प्रकार आहे? मुळात या प्रकाराची गरज काय? याकरीता सरकारने सार्वमत घेऊन लोकांच्या भावना जाणून घ्यायला हव्यात’, असे देशपांडे म्हणाले.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘राज्य सरकारच्या तिजोरीत पैशाचा खडखडाट असून शेतकऱ्यांना त्यांचे पैसे दिले जात नाहीत. वीज कापणी जोरात सुरू आहे. एसटी कर्मचारी पगार होत नाहीत म्हणून संपावर आहेत, बेस्ट कर्मचाऱ्यांचीही अशीच अवस्था आहे, पैसे नाहीत म्हणू नोकरभरती होत नाही. मग हा अवाढव्य खर्च नेमका कशासाठी आणि कुणाच्या सांगण्यावरून?’, असा सवालही त्यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘शरीरात चुकीचं औषध टाकून मला संपवण्याचा होता डाव’, नितेश राणेंचा गंभीर आरोप
- माढ्यात गाईने दिला एकाच वेळी दोन वासरांना जन्म!
- यांच्या घरात रोज पेनड्राईव्ह बाळंत होतात का?; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
- CSK vs KKR : कधी, कुठे, केव्हा पाहता येणार IPL 2022चा पहिला सामना? वाचा एका क्लिकवर!
- “तुमचा जो महाराष्ट्रद्रोही आत्मा आहे, तो शांत करा” , राऊतांचा फडणवीसांना सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
