नवी दिल्ली: राज्यात आणि देशभरात विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपट करमुक्त करण्यात यावा अशी मागणी भाजप करत आहे. मात्र यावरच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी कश्मीर फाइल्स चित्रपट करमुक्त करण्याऐवजी भाजपने चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री यांना तो युट्युबवर अपलोड करण्यास सांगावे, असा सल्ला दिला आहे. ते विधानसभेत बोलत होते.
दिल्ली मध्येही ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपट करमुक्त करण्यात यावा अशी मागणी भाजप करत आहे, यावरच केजरीवाल यांनी हा सल्ला दिला आहे. तसेच कश्मिरी पंडितांच्या नावावर काही लोकांनी करोडोंची कमाई केली आहे आणि तुम्ही फक्त पोस्टर लावत आहात असे केजरीवाल यांनी विधानसभेत भाजपला उद्देशून म्हटले.
यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला.“8 वर्षे केंद्र सरकार चालवल्यानंतर देशाच्या पंतप्रधानांना विवेक अग्निहोत्रीच्या चरणी आसरा घ्यावा लागत असेल तर त्याचा अर्थ पंतप्रधानांनी 8 वर्षात एकही काम केले नाही”, अशी टीका अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. संपूर्ण भाजप देशभरात एका चित्रपटाचे पोस्टर लावत आहे.असे चित्रपटाचे पोस्टर लावण्यासाठी तुम्ही राजकारणात आले होते का? तुमच्या मुलांना काय उत्तर द्याल घरी जाऊन? असा सवालही केजरीवाल यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
“हिंदूद्वेष नसानसात भिनलेले दुतोंडी गांडूळ”, भातखळकरांचा केजरीवालांवर निशाणा
“परमबीर सिंह यांच्या CBI चौकशीमुळे बरेच उंदीर…”; चंद्रकांत पाटलांचा टोला
आवडता नेता कोण विचारताच अमृता फडणवीस म्हणाल्या; “घर की मुर्गी…”
केंद्राने हटवलेले निर्बंध हे दुसरे स्वातंत्र्यच आहे- संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

