🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२चा (IPL 2022) सलामीचा सामना उद्या शनिवारी २६ मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात खेळवला जाईल. दोन्ही संघ गेल्या हंगामातील अंतिम फेरीतील संघ आहेत. यावेळी दोन्ही कर्णधारांमध्येही रंजक सामना पाहायला मिळणार आहे. केकेआरचा संघ आपला नवा कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे, तर सलामीच्या सामन्यापूर्वी सीएसकेलाही रवींद्र जडेजाच्या रूपाने नवा कर्णधार मिळाला. या सामन्याच्या दोनच दिवस आधी धोनीने जडेजाकडे संघाची कमान सोपवली. सीएसके आणि केकेआर यांच्यातील सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.
वानखेडेची खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते. या मैदानावर आयपीएलमध्ये सरासरी १८० धावा होतात. लहान चौकार, वेगवान आऊटफिल्डचा फलंदाजांना भरपूर फायदा होतो. वानखेडेवर खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये मोठ्या धावसंख्येचे सामने पाहायला मिळतात. दमदार सुरुवातीच्या जोरावर संघ २०० धावांचे लक्ष्य अगदी सहज गाठू शकतो.
दोन्ही संघांतील सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता खेळवला जाईल. नाणेफेक सात वाजता होईल. सीएसके आणि केकेआर यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल. तर लाइव्ह स्ट्रीमिंग डिस्ने हॉट स्टारवर पाहता येईल. यासह तुम्ही सामन्यांसंबधीच्या बातम्या marathi.maharashtradesha.com या साइटवर वाचू शकता.
महत्त्वाच्या बातम्या –
- ‘शरीरात चुकीचं औषध टाकून मला संपवण्याचा होता डाव’, नितेश राणेंचा गंभीर आरोप
- काय सांगता..! महेंद्रसिंह धोनीनंतर आणखी एक ‘स्टार’ खेळाडू सोडणार कर्णधारपद
- “…मुळे आज अख्ख मंत्रिमंडळ कपडे शिवायला मॉल मध्ये जाणार”, निलेश राणेंचा मविआ नेत्यांना टोला
- मुख्यमंत्र्यांच्या “त्या” घोषणेवर निलेश राणेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “अधिवेशनाच्या काळात आमदार…”
- IPL 2022 : धोनीनं कशी सोडली CSKची कॅप्टनशिप? ‘असा’ होता दिवसभरातील घटनाक्रम!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
