माढा : शेतकरी दुभत्या जनावरांना कुटुंबातील सदस्याप्रमाणे जपत असतात. याचं फळ या शेतकऱ्याला मिळाले असल्याचे दिसत आहे. माढ्यातील गणेश साळुंके या शेतकऱ्याच्या गाईने एकाच वेळेस चक्क दोन वासरांना जन्म दिला आहे.
मागील पाच वर्षांपूर्वी बारा हजार रुपयाला ही गाई शेतकरी साळुंके यांनी खरेदी केली होती. त्यांच्या घरातील वातावरण अत्यंत आनंदी आहे. गायीचं भागात लोक कौतुक करीत आहेत. असा चमत्कार क्वचित पाहायला मिळतो, असेही बोलले जात आहे. माढयासह परिसरातील पशुपालक शेतकरी वर्गामध्ये कुतूहल निर्माण झाले आहे.
गाईने जन्म दिलेल्या दोन्ही वासरांची प्रकृती सदृढ आहे. सोलापूर मार्गावरील ग्रीन सिटी पार्कच्या नजीक गणेश साळुंके यांची शेती आहे. साळुंके यांच्या गाईला एकाच वेळेस दोन वासरू झाल्यामुळे साळुंके कुटुंबीय आनंदून गेले आहे. पेढे वाटून त्यांनी आनंद साजरा केला असल्याची माहिती आहे.
महत्वाच्या बातम्या –
“…मुळे आज अख्ख मंत्रिमंडळ कपडे शिवायला मॉल मध्ये जाणार”, निलेश राणेंचा मविआ नेत्यांना टोला
मुख्यमंत्र्यांच्या “त्या” घोषणेवर निलेश राणेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “अधिवेशनाच्या काळात आमदार…”
IPL 2022 : धोनीनं कशी सोडली CSKची कॅप्टनशिप? ‘असा’ होता दिवसभरातील घटनाक्रम!
“ठाकरे सरकारची चिंधीगिरी आता…”, भातखळकरांचा हल्लाबोल
“भाजपने विवेक अग्नीहोत्रींना चित्रपट ‘youtube’ वर अपलोड करण्यास सांगावे”, केजरीवालांचा सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

