मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी काल (२४ मार्च) विधानसभेत पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर निशाणा साधत नवीन पेनड्राईव्ह बॉब्म फोडला. त्यांनी एका नव्या पेनड्राईव्हचा उल्लेख करत मुंबईचे माजी पोलीस अधिकारी इसाक बागवान यांच्यावर गंभीर आरोप केले. यावरच शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut ) यांनी खोचक शब्दांत प्रतिक्रिया देत निशाणा साधला.
“राज्यात इतके नीच आणि हलकट पातळीवरचं राजकारण यापूर्वी कधीही झालं नव्हतं. आम्ही काय पाकिस्तानातून आलो आहोत का? उलट तुमचे संबंध आहेत. यांच्या घरात रोज पेनड्राईव्ह बाळंत होतात का? बघावं लागेल.मात्र आम्ही एकच कव्हर ड्राईव्ह मारू खाटकन”, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
तसेच नुसतं बोंबलून चालतं का? रोज एक खोटं भंपक प्रकरण तयार करायचं.कसंकाय त्यांना हे बाळंतपण जमतं माहीत नाही. कुठून सुईणी आणतात हे खोट्या प्रकरणांची बाळंतपणं करण्यासाठी? वैद्यकीय क्षेत्रात रिसर्च करण्याची गोष्ट आहे की, आमच्याकडे रोज एक पेनड्राईव्ह बाळंत होतोय. रोज काढतायत, मग ते ओरडतायत. पेनड्राईव्हची काही टेस्ट ट्यूब बेबी काढली आहे का? असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या:
मुख्यमंत्र्यांच्या “त्या” घोषणेवर निलेश राणेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “अधिवेशनाच्या काळात आमदार…”
‘शरीरात चुकीचं औषध टाकून मला संपवण्याचा होता डाव’, नितेश राणेंचा गंभीर आरोप
काय सांगता..! महेंद्रसिंह धोनीनंतर आणखी एक ‘स्टार’ खेळाडू सोडणार कर्णधारपद
“…मुळे आज अख्ख मंत्रिमंडळ कपडे शिवायला मॉल मध्ये जाणार”, निलेश राणेंचा मविआ नेत्यांना टोला
IPL 2022 : धोनीनं कशी सोडली CSKची कॅप्टनशिप? ‘असा’ होता दिवसभरातील घटनाक्रम!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

