Share

“तुमचा जो महाराष्ट्रद्रोही आत्मा आहे, तो शांत करा” , राऊतांचा फडणवीसांना सल्ला

Published On: 

मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी काल (२४ मार्च) विधानसभेत नवीन पेनड्राईव्ह बॉब्म फोडला. त्यांनी एका नव्या पेनड्राईव्हचा उल्लेख करत मुंबईचे माजी पोलीस अधिकारी इसाक बागवान यांच्यावर गंभीर आरोप केले. यावरच शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut ) यांनी खोचक शब्दांत प्रतिक्रिया देत त्यांना सल्ला दिला आहे.

“केंद्रीय तपास यंत्रणा आणि राज्यातले विरोधी पक्षनेते यांची हातमिळवणी असून मिलिभगत सुरू आहे. त्यातून असं दिसतंय की, राज्यातलं सरकार त्यांना चालू द्यायचं नाहीये. त्यांना हे सरकार खोट्या प्रकरणातून उद्ध्वस्त करायचंय. ‘याला तुरुंगात टाकू, त्याला तुरुंगात टाकू’ एकदा त्यांनी ज्यांना ज्यांना तुरुंगात टाकायचंय, त्यांची एक यादी तयार करा. ती केंद्रीय तपास यंत्रणांना देऊन सांगा की या २५ लोकांना तुरुंगात टाकायचंय. आम्हाला आधी तुरुंगात टाका आणि मग आरोप करा, काही हरकत नाही. तुमचा जो महाराष्ट्रद्रोही आत्मा आहे, तो शांत करा”, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

तसेच “राज्यात इतके नीच आणि हलकट पातळीवरचं राजकारण यापूर्वी कधीही झालं नव्हतं. आम्ही काय पाकिस्तानातून आलो आहोत का? उलट तुमचे संबंध आहेत. यांच्या घरात रोज पेनड्राईव्ह बाळंत होतात का? बघावं लागेल.मात्र आम्ही एकच कव्हर ड्राईव्ह मारू खाटकन”, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या:

मुख्यमंत्र्यांच्या “त्या” घोषणेवर निलेश राणेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “अधिवेशनाच्या काळात आमदार…”

‘शरीरात चुकीचं औषध टाकून मला संपवण्याचा होता डाव’, नितेश राणेंचा गंभीर आरोप

काय सांगता..! महेंद्रसिंह धोनीनंतर आणखी एक ‘स्टार’ खेळाडू सोडणार कर्णधारपद

“…मुळे आज अख्ख मंत्रिमंडळ कपडे शिवायला मॉल मध्ये जाणार”, निलेश राणेंचा मविआ नेत्यांना टोला

IPL 2022 : धोनीनं कशी सोडली CSKची कॅप्टनशिप? ‘असा’ होता दिवसभरातील घटनाक्रम!

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!