मुंबई : काल (२४ मार्च) विधानसभेत बोलत असतांना भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मी कोल्हापूरच्या रुग्णालयात असताना मला अँजिओग्राफी करण्याचा आग्रह धरला होता. त्यानंतर एका कर्मचाऱ्याने मला येऊन सांगितले की तुम्ही कोणत्याही परिस्थितीत अँजिओग्राफीला होकार देऊ नका. तुमच्या शरीरात इंक टाकून तुम्हाला मारण्याचा प्लॅन आहे. माझी परिस्थिती खराब असतानाही मला अटक करण्यासाठी मध्यरात्री अडीच वाजता दोनशे पोलिस आले होते, असा गंभीर आरोप केला आहे.
पुढे ते म्हणाले की, ‘माझी शुगर लेव्हल कमी होत होती. तरीही मला पोलीस अटक करण्यासाठी येत होते. दिशा सालियनची आत्महत्या असेल तर मग सीसीटीव्ही का गायब केले. दिशाची आत्महत्या नाही, ती हत्या आहे.’
दरम्यान, ‘राज्यभरात गुन्हे वाढत असून राज्य सरकारकडून त्या संबंधी खोटी माहिती दिली जात आहे.’ तसेच त्यांना फक्त विरोधी पक्षातील लोकांवर गुन्हे दाखल करायचे आहेत, असेही राणे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- “भाजपने विवेक अग्नीहोत्रींना चित्रपट ‘youtube’ वर अपलोड करण्यास सांगावे”, केजरीवालांचा सल्ला
- “ठाकरे सरकारची चिंधीगिरी आता…”, भातखळकरांचा हल्लाबोल
- IPL 2022 : धोनीनं कशी सोडली CSKची कॅप्टनशिप? ‘असा’ होता दिवसभरातील घटनाक्रम!
- मुख्यमंत्र्यांच्या “त्या” घोषणेवर निलेश राणेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “अधिवेशनाच्या काळात आमदार…”
- “…मुळे आज अख्ख मंत्रिमंडळ कपडे शिवायला मॉल मध्ये जाणार”, निलेश राणेंचा मविआ नेत्यांना टोला

