Share

काँग्रेस सत्तेत भागीदार आहे की नाही?, बाळासाहेब थोरातांना खुर्ची नाही

Published On: 

मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेकडून संजय राऊत, कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी काल (गुरुवार) उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार , महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते. मात्र बाळासाहेब थोरात यांना खुर्ची नसल्यामुळे काँग्रेस सत्तेत भागीदार आहे की नाही यावर प्रश्न निर्माण झाला आहे.

राज्यात तीन पक्षांनी मिळून तयार केलेल्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना हे मित्र पक्ष आहेत. मात्र महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद नेहमीच चव्हाट्यावर आले आहेत. यापूर्वी देखील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर उघड नाराजी व्यक्त केली होती. आता पुन्हा एकदा बाळासाहेब थोरातांना खुर्ची न दिल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आल आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस ही काँग्रेसच्या पाठीत सुरा खुपसण्याचे काम करीत आहे-

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याच लोकसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांची निवडणूक पटोले यांनी प्रतिष्ठेची केली होती. भाजपला खिंडार पाडले होते. भाजपमधल्या माजी आमदार चरण वाघमारे यांच्या गटाने बंड करून काँग्रेसला यश मिळवून दिले होते. ही बंडखोरी झाल्यामुळे भंडाऱ्यासोबतच गोंदिया येथील निवडणुकांत राष्ट्रवादीने भाजपशी हातमिळवणी करून काँग्रेसला एकाकी पाडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. यावेळी मैत्रीचा हात पुढे करून राष्ट्रवादी काँग्रेस ही  काँग्रेस पक्षाच्या पाठीत सुरा खुपसण्याचे काम करीत आहे. आमच्या विरोधात त्यांच्या कुरघोड्या सातत्याने सुरू आहेत. याचा जाब आम्ही त्यांना नक्कीच विचारू!, असे पटोले म्हणाले होते.

 

नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर देखी टीका केली, यावरून महाविकास आघाडीत तणाव निर्माण होईल का? असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला. यावर संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते.

“नाना पटोलेंच्या टीकेला उत्तर देण्यासाठी शरद पवार आणि त्यांचे सर्व सहकारी समर्थ आहेत. मात्र महाविकास आघाडीतील प्रत्येक नेत्याने तोलून-मापून विधाने केली पाहिजेत. महाविकास आघाडीच्या एकतेला तडा जाईल अशा प्रकारे कोणी बोलू नये, असं सगळ्यांचंच म्हणणं आहे”, असे संजय राऊत म्हणाले होते.

हे सर्व वादविवाद बघता काँग्रेस सत्तेत भागीदार आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. आता पुन्हा बाळासाहेब थोरात यांना खुर्ची न दिल्यामुळे काँग्रेसच्या वर्तुळात नाराजी पसरली आहे. यापूर्वी देखील काँग्रेसने शिवसेना, राष्ट्रवादीवर देखील नाराजी व्यक्त केली होती. “अडीच वर्षांपूर्वी ज्या मुद्द्यांवर सरकार बनलं होतं त्याचं उल्लंघन होत आहे. त्यामुळे आमच्या नेत्या सोनिया गांधी यांचा अपमान होत असून आम्ही ते सहन करणार नाही. पक्षश्रेष्ठींकडे राष्ट्रवादीच्या भूमिकेची आम्ही तक्रार केली आहे. पक्षश्रेष्ठी लवकरच त्या तक्रारीबद्दल निर्णय घेतील. येणाऱ्या काही दिवसात त्याचे परिणाम दिसतील. आम्ही सत्तेत राहण्यासाठी सरकारमध्ये नाही”, असे नाना पटोले यांनी म्हटले होते.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!