“अनिल देशमुखांच्या बाजूच्या खोलीत बुकिंग करा” ; किरीट सोमय्यांची अनिल परब वर टीका
ईडीने महाराष्ट्राचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्या निवासस्थानासह 7 ठिकाणी छापे टाकले. याशिवाय दापोली आणि पुण्यातील काही ठिकाणी त्यांच्या रिसॉर्टवरही ईडीने छापे टाकले. यासंदर्भात बोलताना आज भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर टीका केली आहे. आज ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.