Share

रुपाली पाटलांची आक्षेपार्ह पोस्ट, मुंडके छाटण्याची भाषा ; चंद्रकांत पाटील निशाण्यावर!

Published On: 

पुणे : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर महाविकासआघाडी आणि भाजप यांच्यामध्ये जोरदार घमासान सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत प्रतिक्रिया देताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संताप व्यक्त केला होता. ओबीसी आरक्षण संदर्भात भाजपने मंत्रालयावर मोर्चा आयोजित केला होता. या मोर्चादरम्यान चंदक्रांत पाटील यांनी सुप्रिया सुळेंना उद्देशून केलेल्या वक्तव्याचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. ‘तुम्ही दिल्लीत जा, नाही तर मसणात जा, पण शोध घ्या आणि आरक्षण द्या’ अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली होती. चंद्रकांतदादांच्या याच विधानाचा समाचार राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी घेतला आहे.

रुपाली ठोंबरे यांनी आपल्या फेसबूकवर एक चित्र शेअर केले आहे. “भाजपचे अध्यक्ष ,आमदार चंद्रकांत पाटील हे खासदार सुप्रिया ताई यांना मसनात जा म्हणाले खरं पण मसनात असणारी स्त्री महाकालीच की चंपादादा, आणि ती तुमच्या सारख्या राक्षसी विचारांचे मुंडक छाटतेच. हे लक्षात ठेवा जय महाकाली,” अशा कठोर शब्दात रुपाली ठोंबरे यांनी चंद्रकांत पाटलांवर टीका केली आहे.

https://www.facebook.com/Rupalispeak/posts/pfbid0u96C4bsuFsnqi4YMSsbY1ZGNtENhEN1AhtxweRVWgNfk4EJEAFmFgYuX31R8nBCQl

यापूर्वी ‘तुम्ही कशाला राजकारणात राहता, घरी जा आणि स्वंयपाक करा, खासदार आहात ना तुम्ही ! कळत नाही का ? एका मुख्यमंत्र्यांची भेट कशी घ्यायची, कळत नाही का ?, एक शिष्टमंडळ पाठवायचे, आता घरी जाण्याची वेळ झाली आहे, अशा शेलक्या शब्दात चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली होती. त्या टिकेला सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे यांनीही प्रत्युत्तर दिल आहे. त्यांनी याबाबत टि्वट केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

 

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!