मुंबई : पाकिस्तानचा डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी हा आतापर्यंतच्या सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक मानला जातो. आफ्रिदीकडे चेंडू स्विंग करण्याची क्षमता आहे आणि या कारणास्तव अनेक लोक त्याची तुलना पाकिस्तानचा महान गोलंदाज वसीम अक्रमशी करतात. आफ्रिदीने नुकतीच जगातील सर्वात लोकप्रिय टी-२० लीग आयपीएल (IPL) मध्ये खेळण्याची प्रतिक्रिया दिली.
शाहीन आफ्रिदी पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळतो आणि या मोसमात त्याने प्रथमच लाहोर कलंदर्सचे नेतृत्व करताना विजेतेपद पटकावले. आयपीएल ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग आहे. ही स्पर्धा जगभरातील दिग्गजांसह खेळण्याचा अनुभव तसेच खेळाडूंना प्रचंड पैसे कमविण्याची संधी देते.
Shaheen Shah Afridi on being asked of playing in Indian Premier League (IPL) ever? "Playing for your country is the proudest moment for any cricketer and so my priority is always my Pakistan. Playing all three formats for your country and then PSL is enough for me right now"
— Arfa Feroz Zake (@ArfaSays_) May 23, 2022
या लीगमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंना पहिल्या हंगामात म्हणजेच आयपीएल २००८मध्ये खेळण्याची संधी मिळाली होती पण त्यानंतर त्यांच्यावर बंदी घालण्यात आली होती. आफ्रिदी म्हणाला, ”आपल्या देशासाठी खेळणे हा कोणत्याही क्रिकेटपटूसाठी सर्वात अभिमानाचा क्षण असतो, त्यामुळे माझे प्राधान्य नेहमीच माझे पाकिस्तान असते. माझ्या देशासाठी आणि नंतर पीएसएल या तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणे आता माझ्यासाठी पुरेसे आहे. देशासाठी सर्वोत्तम देण्यासाठी मला फिटनेस राखला पाहिजे. आयपीएल किंवा इतर कोणतीही लीग, आंतरराष्ट्रीय क्रिकेटपेक्षा कमी महत्त्वाची आहे. माझे मुख्य लक्ष राष्ट्रीय संघासाठी माझी कामगिरी आहे.”
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

