Share

“शिवाजी महाराजांना मारण्यासाठी आलेल्या औरंगजेबाच्या कबरीसाठी फंडिंग कुठून येतं” ; राज ठाकरेंचा सवाल

Published On: 

पुणे : गेल्या कित्येक वर्षांपासून औरंगाबाद शहराचे नामकरण ‘संभाजीनगर’ करण्याचा मुद्दा प्रलंबित आहे. यावरूनच मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज २२ मे रोजी पुण्यातील सभेत शिवसेना प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच यासह छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्यासाठी आलेल्या औरंगजेबाच्या कबरीसाठी फंडींग कुठून येतं? असा सवालही त्यांनी उपस्थितीत केला आहे.

राज ठाकरे आजच्या पुण्यातील सभेत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्यासाठी आलेल्या औरंगजेबच्या कबरीवर ओवेसी येऊन माथा टेकवतो आणि सरकार यावर काही करत नाही. याची आम्हाला लाजही वाटत नाही.  या औरंगजेबच्या कबरीसाठी फंडींग सुरु आहे. हा फंडिंग कुठून येतं आहे? असा सवाल यावेळी त्यांनी उस्थितीत केला आहे.

दिपाली सय्यद यांचा राज ठाकरेंवर पलटवार –

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात आज २२ मे रोजी (रविवारी) सभा पार पडली.  या सभेत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. या पाश्वर्भूमीवर आता शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी जोरदार पलटवार केला आहे. उद्धव ठाकरेंनी एकही आंदोलन केले नाही त्यांच्यावर एकही केस नाही, असे राज ठाकरे म्हणाले. यावर दिपाली सय्यद यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. म्हणाल्या, “आंदोलन केल्यानंतर केसेस घेऊन देश नाही चालवू  शकत, देश चालविण्यासाठी बुद्धिमत्ता लागते, संयम लागतो”.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!