Share

IPL 2022 MI vs DC : जणू फायनल जिंकल्याचा आनंद..! मुंबईच्या विजयानंतर विराट कोहलीचं नाचून सेलिब्रेशन; VIDEO व्हायरल!

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने प्लेऑफमध्ये स्थान निश्चित केले आहे. लीगच्या ६९व्या सामन्यात शनिवारी मुंबई इंडियन्सने रोमहर्षक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा (MI vs DC) ५ गडी राखून पराभव केला. अशाप्रकारे दिल्लीचा संघ बाद फेरीतून बाहेर पडला. आरसीबीचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचताच विराट कोहलीने कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि इतर सहकारी खेळाडूंसोबत आनंद साजरा केला.

जर दिल्ली कॅपिटल्सचा संघ हा सामना जिंकला असता, तर तो प्लेऑफमध्ये पोहोचला असता, कारण त्यांचा नेट रन रेट आरसीबीपेक्षा चांगला होता. अशा परिस्थितीत आरसीबीचा संघ दिल्लीच्या पराभवासाठी प्रार्थना करत होता. आरसीबीने संघाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यात साडेसात वाजल्यापासून संपूर्ण संघ टीव्हीवर सामना पाहत होता. सामना साडेअकरा वाजता संपला. त्यानंतर टीव्हीसमोर उभे राहून विराट आणि आरसीबीच्या खेळाडूंनी सेलिब्रेशन केले. विराट कोहलीने केवळ जबरदस्त डान्सच केला नाही तर सहकारी खेळाडूंनाही मिठीसुद्धा मारली.

विजयानंतर खेळाडूंनी आरसीबी, आरसीबी, आरसीबी… अशा घोषणाही दिल्या. कोहलीने प्रशिक्षक संजय बांगर यांनाही मिठी मारली. यानंतर कोहली म्हणाला, ”मुंबईचे आभार.” या सामन्यात प्रथम खेळताना दिल्लीने ७ विकेट्सवर १५९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मुंबईने १९.१ षटकांत ५ गडी राखून लक्ष्य गाठले. टिम डेव्हिडने केवळ ११ चेंडूत ३४ धावा करत विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने २ चौकार आणि ४ षटकार मारले. मुंबईचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने २५ धावांत ३ बळी घेतले. त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!