🕒 1 min read
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात आज २२ मे रोजी (रविवारी) सभा पार पडली. ही सभा पुण्याच्या स्वारगेट परिसरातील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आयोजित केली होती. या सभेत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. या पाश्वर्भूमीवर आता शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी जोरदार पलटवार केला आहे.
उद्धव ठाकरेंनी एकही आंदोलन केले नाही त्यांच्यावर एकही केस नाही, असे राज ठाकरे म्हणाले. यावर दिपाली सय्यद यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. म्हणाल्या, “आंदोलन केल्यानंतर केसेस घेऊन देश नाही चालवू शकत, देश चालविण्यासाठी बुद्धिमत्ता लागते, संयम लागतो”. तसेच प्रत्येक घराघरात पत्र पाठविण्यावर दिपाली सय्यद यांनी प्रश्न उपस्थितीत केला आहे म्हणाल्या, हे जे पत्र तुम्ही घराघरात देणार आहात त्या पत्राने तुम्ही रोजगार देणार आहात की चांगलं शिक्षण देणार आहात?
यावेळी मुख्यमंत्र्यांची सभा झाली. काय पोरकटपणा चालू आहे मला कळतच नाही. आमचं खरं हिंदुत्व, यांचं खोटं हिंदुत्व. वॉशिंग पावडर विकताय का तुम्ही? तुम्हारी कमीज हमारी कमीजसे सफेद कैसे? अशीही टीका राज ठाकरे यांनी केली. यालाही जोरदार प्रत्युत्तर दिपाली सय्यद यांनी दिले आहे. म्हणाल्या, “आज महाराष्ट्राने घाबरलेला भोंगा पाहिला. पत्रक घरोघरी दिल्यानंतर तुम्हीं आंदोलन करून जेलमध्ये जाणार आणि अमित ठाकरे लपून बसणार. हा शिलेदारांसाठी मोठा ट्रॅप आहे. केसेसला घाबरून दौरा रद्द करणारा स्वताला हिंदूजननायक म्हणूच शकत नाही”.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
