Share

सचिन सावंतांची राज ठाकरेंच्या भाषणावर प्रतिक्रिया! म्हणाले, “भाजपने मनसेची..”

Published On: 

🕒 1 min read

पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची पुण्यात आज २२ मे रोजी (रविवारी) सभा झाली. यावेळी त्यांनी आपल्या अयोध्या दौऱ्यामागील कारण स्पष्ट केले. ज्या दिवशी आपण लाऊडस्पीकर बंदची घोषणा केली, तेव्हा पुण्यात अयोध्येला जाण्याची तारीख जाहीर केली. त्यानंतर काही दिवसांतच हे प्रकरण सुरू झालं. अयोध्येला येऊ देणार नाही वगैरे. मी सगळं पाहात होतो काय चाललंय ते. मला मुंबई, दिल्ली, उत्तर प्रदेशातून माहिती मिळत होती. एक वेळ अशी आली की मला लक्षात आलं की हा सापळा आहे. आपण या सापळ्यात अडकायला नको. कारण या सगळ्या गोष्टींची रसद महाराष्ट्रातून सुरू झाली. असा आरोप राज ठाकरेंनी केला आहे. यावरच आता काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“राज ठाकरे यांनी आज आपल्या भाषणात ‘अयोध्या दी ट्रॅप’ या चित्रपटातीची अत्यंत गंभीर कहाणी सांगितली. आणि या कहाणीचा रचेता दुसरा कुणी नसून भाजप आहे. हे महाराष्ट्रातील जनतेला कळून चुकले आहे. एकंदरीत त्यांनी म्हटले की, अयोध्याला गेले असते तर मनसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असता. मात्र तिथे महाविकास आघाडी सरकार नाही तर योगी आदित्यनाथ यांचे भाजप सरकार आहे. म्हणजे राज ठाकरेंच्या म्हणण्यानुसार भाजप सरकारने मनसैनिकांना जेलमध्ये टाकले असते. हे यातून दिसून येत आहे.”, असे सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

जर महाराष्ट्रातून रसद पुरवण्याचा कुणी प्रयत्न केला असेल तर, तो भाजपचाच असू शकतो. त्यामुळे आम्ही काही दिवसांपूर्वी सांगितले होते ते सत्य आहे, राज ठाकरे यांनीही ते स्वतः मान्य केले आहे. राज ठाकरेंच्या मनसेची कुचंबना करण्याचे काम भाजपने केले आहे. ज्यावेळी कळाले की, हिंदुत्वाच्या वोट बँकेत अजून एक वाटेकरी तयार होत आहे, त्यावेळी विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाने औरंगाबाद सभेआधी काढता पाय घेतला. आणि दुसरीकडे उत्तर भारतीय मतदारांमध्ये प्रभाव टाकण्यासाठी मनसेची जाणीवपूर्वक नामुष्की करण्यात आली.हे देखील यातून दिसले आहे. असा आरोप सचिन सावंत यांनी केला आहे.

नेमके काय म्हणाले राज ठाकरे?

ज्यांना ज्यांना माझी अयोध्या वारी खुपली, असे अनेक जण होते. त्या सगळ्यांनी सगळ्या गोष्टी मिळून आराखडा आखला गेला. मी एकाच गोष्टीचा विचार केला. मी अयोध्येला जाणार, याचा जो विचार मनात होता.. रामजन्मभूमीचं दर्शन घेणं आलंच. पण मला वाटतं तुमच्यापैकी अनेकजण तेव्हा जन्मालाही आले नसतील. तेव्हा आजच्यासारखे चॅनल्स नव्हते. तेव्हा फक्त दूरदर्शन हे एकच चॅनल होतं. तेव्हा दूरदर्शनवर न्यूज रील्स चालवायचे. मला आजही आठवतं जेव्हा मुलायमसिंह सरकार उत्तर प्रदेशात होतं, भारतातून सर्व ठिकाणाहून कारसेवक अयोध्येला गेले, तेव्हा आपल्या सर्व कारसेवकांना ठार मारण्यात आलं होतं. त्या सर्व कारसेवकांची प्रेतं शरयू नदीत तरंगताना मी पाहिली होती. मला राम जन्मभूमीचं दर्शन घ्यायचं होतंच, पण जिथे माझे कारसेवक मारले गेले, त्या जागेचंही दर्शन मला घ्यायचं होतं. असे राज ठाकरे यांनी सांगितले.

राजकारणात भावना अनेकांना समजत नसतात. पण ज्या प्रकारचा माहौल तिथे उभा केला जात होता मी उद्या जर तिथे जायचं ठरवलंच असतं, तर महाराष्ट्रातून अनेक बांधव तिथे आले असते. तिथे जर काही झालं असतं, तर आपली पोरं तर गेली असती अंगावर. तुमच्यावर केसेस टाकल्या गेल्या असत्या, जेलमध्ये सडवलं गेलं असतं आणि हकनाक काही कारण नसताना तो ससेमिरा तुमच्या पाठिशी लावला असता. म्हटलं मी आपली पोरं हकनाक घालवणार नाही अशी. या सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांवर देखील केसेस टाकल्या असत्या आणि ऐन निवडणुकीच्या वेळी इथे कुणीच नसतं. हा सगळा सापळा होता. असा आरोपही राज ठाकरे यांनी केला.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!