🕒 1 min read
सांगली : शिवसेना आणि राणे कुटुंबीय यांच्यातलं वाकयुद्ध सर्वश्रुत आहे. शिवसेना आणि राणे कुटुंबीय यांच्यात नेहमीच आरोप प्रत्यारोप होत असतात. आता भाजपचे नेते व आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला लक्ष्य केले आहे. नितेश राणे यांनी शिवसेना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर टीका केली आहे.
सगळ्या नोटिसा ह्या फक्त उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर मिळतात काय? आमचं घर बारा वर्षापासून तिथे आहे. आत्ताच मुंबई महापालिकेला जाग आली का? आताच सी आर झेड डिपार्टमेंटला जाग आली का ? जे उत्तर द्यायचं ते आम्ही 10 जूनला देऊ. आम्ही कायदेशीर उत्तर देऊ. या सगळ्या गोष्टी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतरच कश्या येतात, अशी टीका आमदार नितेश राणे यांनी केली. सांगली जिल्ह्यातील मिरज येथे आमदार नितेश राणे हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
चंद्रकांत खैरे हे काय सकाळी आमच्या घरी चहा घेऊन येतात का, त्यांना माहीत व्हायला की, आमच्या घरी आम्ही कोणाला पैसे वाटतोय हे बघायला. ते माजी खासदार आहेत की बँकेचे मॅनेजर आहेत? खैरे यांनी आरोप सिद्ध करून दाखवावेत, असा टोलाही आमदार नितेश राणे यांनी लगावला.
अनिल परब यांचा जर रिसॉर्ट नव्हते तर मग हे पाणी पट्टी आणि घर पट्टी कसे भरत होते. आत्ता त्यांचे आत जाण्याचे दिवस आलेत, असे राणे म्हणाले. राज्यसभेचे भाजपचे तीन उमेदवार जाहीर झालेत, मग काळ्या मांजरा सारखे का आडवं येताय? आमचे तीन ही उमेदवार निवडून येणार आहेत, असा दावाही आमदार नितेश राणे यांनी यावेळी केला.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
