Share

“काँग्रेस नेत्यांना कव्वाली, शायरी, मुशायरे शिकवावेत” ; आशिष देशमुखांची नाना पटोलेंवर टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत डिपॉझिट जप्त झालेल्या इम्रान खान यांना काँग्रेसने महाराष्ट्रातून राज्यसभेची उमेदवारी दिली. यावर काँग्रेसचे प्रदेश महासचिव आशिष देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यानंतर माजी आमदार डॉ. अशिष देशमुख यांनी आपल्या काँग्रेस प्रदेश महासचिव पदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले आहे. यानंतर त्यांनी काँग्रेसच्या नेते नाना पाटोले यांच्यावर टीका केली

“इम्रान प्रतापगडी यांचं एकच क्वालिफिकेशन आहे ते म्हणजे ते कव्वाल आहेत, शायर आहेत आणि मुशायरे करतात. यावरूनच त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं नाव घेत काँग्रेस नेत्यांना कव्वाली, शायरी, मुशायरे शिकवावेत, ते शिकवण्यासाठी इम्रान प्रतापगडी महाराष्ट्रात आले तर नक्कीच आनंद होईल, अशी टीका काँग्रेसचे प्रदेश महासचिव आशिष देशमुख यांनी नाना पाटोले यांच्यावर केली आहे.

राजस्थानमधून काँग्रेस पक्षात तीव्र नाराजी –

राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने एकूण १० उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. काँग्रेसमधील पक्षातील अनेक ज्येष्ठ आणि राज्यसभेसाठी इच्छूक नेत्यांचे नाव नसल्याने आता पक्षात नाराजीनाट्य रंगले आहे. राजस्थानमधूनही काँग्रेस पक्षात तीव्र नाराजी दिसून येत आहे. राजस्थानच्या राज्यसभा कोट्यातून रणदीप सिंग सुरजेवाला, मुकुल वासनिक आणि प्रमोद तिवारी यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र हे तिन्ही उमेदवार राजस्थानचे नाहीत. या तिन्ही नावांना राजस्थानच्या सिरोही विधानसभाचे काँग्रेस आमदार संयम लोढा यांनी आक्षेप घेतला आहे. राजस्थानमधल्या कोणालाही उमेदवारी का जाहीर झाली नाही? याचे स्पष्टीकरण पक्षाला द्यावं लागणार असल्याचं त्यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!